राजनाथ सिंहांवर रागावल्याचे कोणी पाहिले? राणेंनी उडवली ठाकरेंची खिल्ली

नारायण राणे यांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका
Narayan Rane, Uddhav thackeray News
Narayan Rane, Uddhav thackeray NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज 'मातोक्षी'वर माजी आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री व भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांच्या बद्दल वक्तव्य केले. ते म्हणाले, राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांचा फोन आला होता, त्यावेळी त्यांनी फोनवर अस्सलाम वालेकुम म्हटले होते. मात्र, आपण त्यांना जय श्रीराम म्हणत उत्तर दिल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

राणे म्हणाले, राजनाथ सिंह यांच्या फोननंतर उध्दव ठाकरे रागावले असल्याचे कोणी पाहिले. ते एकटेच घरात होते. फार फार तर त्यांच्या पत्नींने पाहिले असेल, असा खोचक टोला राणे यांनी ठाकरेंना लगावला. राजनाथ सिंह संरक्षण मंत्री आहेत. उध्दव ठाकरे कोण आहेत, त्यांच अस्तित्व काय, त्यांना इतरांकडे हात जोडत फिरावे लागत असल्याचे सांगत राणे यांनी उद्धव ठाकरे यांची खाल्ली उडवली. यासोबतच मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, अशी प्रतिक्रिया देखील राणे यांनी व्यक्त केली.

Narayan Rane, Uddhav thackeray News
संतोष बांगर यांनी आव्हान दिले पण उद्धव ठाकरेंनीही ते मोडण्याचं प्लॅनिंग केलंय...

आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, राष्ट्रपती निवडणुकीसाठी राजनाथ सिंह यांचा फोन आला होता. त्यावेळी राजनाथ यांनी फोनवर मला अस्सलाम वालेकुम म्हणून बोलण्यास सुरुवात केली होती. त्यांची ही भाषा ऐकून मला धक्काच बसला होता. त्यांच्या या कृत्यावर भडकल्यानंतर ते जय श्रीराम म्हणाले.

Narayan Rane, Uddhav thackeray News
बंडखोर आमदारांना खूष ठेवण्याचा एकनाथ शिंदेंचा प्लॅन; निधीवाटपाची कोटीच्या कोटी उड्डाणे!

दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. ते म्हणाले यापूर्वी सुद्धा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी UPA च्या उमेदवार असलेल्या प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com