BJP Vs NCP : छत्री, कांदे कसले वाटता; अजित पवार गटाने भाजपला सुनावले

NCP heard about distribution of umbrellas and onions of BJP : नवी मुंबईच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक इच्छुक असून विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढवला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नामदेव भगत यांनी चांगलेच सुनावले आहे.
BJP Vs NCP
BJP Vs NCPSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत इच्छुकांची गर्दी अधिक असणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मित्रपक्षांच्या मुंबईत सर्वाधिक जागा मिळाव्यात अशी फिल्डिंग लावून आहेत. यासाठी सर्वच पक्षांतील पदाधिकारी चाचपणी करत आहे. एकमेकांना डिवचून चुचकारण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबईतील राजकीय परिस्थिती संभाळण्याचे आव्हान पक्षांच्या प्रमुखांसमोर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मुंबईतील काही जागांवर चाचपणी करत आहेत. त्यासाठी पक्षाचे नेते, पदाधिकारी हे मित्रपक्षासह विरोधकांना देखील अंगावर घेत आहेत. यातून राजकीय तेढ वाढते आहे.

भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. मुंबईतील बोलापूरमध्ये भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी यातूनच विविध कार्यक्रमांचा सपाटा सुरू केला आहे. छत्री वाटप, स्वस्त दरात कांदे विक्री, असे कार्यक्रम घेतले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नामदेव भगत यांनी संदीप नाईक यांना टोला लगावला आहे. "छत्री वाटप, स्वस्त दरात कांदे वाटपाबरोबर प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे, धोकादायक इमारती झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनाकडे लक्ष द्या", असा टोला नामदेव भगत यांनी संदीप नाईक आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला लगावला आहे.

BJP Vs NCP
Chandrahar Patil : ठाकरेंसह विशाल पाटलांची दिल्लीत भेट; चंद्रहार पाटील म्हणाले, "आता विधानसभेला..."

भाजपचे आमदार गणेश नाईक आणि शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे विजय चौगुले यांचे ऐरोलीत, तर भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांची बेलापूरमध्ये राजकीय कुरघोड्या सुरू आहेत. या मित्र पक्षांमधील पदाधिकाऱ्यांमध्ये गडबड सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने तिथे एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे राजकीय धुरळा उडताना दिसू लागला आहे.

BJP Vs NCP
Rajya Sabha Election : भोसले, गोयल यांच्या जागेवर कोण? महाराष्ट्रासह 9 राज्यांमधील राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणूक

भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी बेलापूरमधून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे. तसा त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे जोर लावला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचा संताप होत आहे. या दोघांमध्ये छोट्या-मोठ्या कार्यक्रमांतून एकमेकांवर भडका उडतो. आरोप-प्रत्यारोप सुरू राहतात. या दोघांच्या राजकीय संघर्षात अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी आता उडी घेतली आहे.

संदीप नाईक यांनी विधानसभा निवडणुकीसाठी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघात वावर वाढला आहे. त्यांच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नामदेव भगत यांनी उपरोधिक टीका केली. या कार्यक्रमांबरोबर नवी मुंबईचे रखडलेल्या प्रकल्पांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली घरे नियमित झालेली नाही, महापालिका, सिडको, एमआयडीसीमध्ये भ्रष्टाचारावर लक्ष द्या. धोकादायक इमारती आणि झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन रखडले आहे. त्याकडेही देखील लक्ष द्या, असा टोला नामदेव भागत यांनी संदीप नाईक यांना लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नामदेव भगत यांची मित्रपत्र भाजपमधील पदाधिकाऱ्यांवर अशी टीका करणे म्हणजे, घरचा आहेर दिल्यासारखे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com