अजितदादा, भुजबळांनीही गावात जाऊन बसावं! जयंत पाटलांनी सांगितला 'प्लॅन'

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात पाटील यांनी ही माहिती दिली.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी रविवारी नव्या उपक्रमाची घोषणा केली. गावागावांत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी पाटील यांनी पक्षातील प्रत्येक नेत्यासह पदाधिकाऱ्यांना यात सहभागी होण्याचे बंधन घातले आहे. महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येक गावात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र येणार असून नेत्यांनाही त्यांच्या गावात जावे लागणार आहे.

पाटील यांनी काँग्रेसच्या सेवादलाची माहिती देत राष्ट्रवादीही आता त्याच भूमिकेतून गावागावात पोहचणार असल्याचे सांगितले. ते म्हणाते, महाराष्ट्रात एकही तालुका असा नाही, ज्याठिकाणी पवारसाहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच नाही. माणसांचे सर्वाधिक धन पवारसाहेबांच्या मागे आहे. माणसं कशी जोडायची, याचा उत्तम आदर्श पवारसाहेबांनी घालून दिला आहे. विचारांची लढाई आपण जेव्हा हरतो, तेव्हा आपली खरी हार व्हायला लागते. काँग्रेस पक्षाने त्यावेळी सेवादल स्थापन केले होते. सेवाभावीवृत्तीने महात्मा गांधींच्या विचाराने खेडेगावात काम व्हावे, यासाठी ही व्यवस्था केली. पवारांच्या विचाराने प्रेरित झालेले कार्यकर्ते पक्षाला मोठ्या प्रमाणावर मिळतील, अशी व्यवस्था आपल्यालाही करायची आहे.

Jayant Patil
राऊतांच्या भेटीनंतर पाचव्या दिवशीच राहुल गांधींचा हिंदुत्ववाद्यांवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील प्रत्येक गावात राष्ट्रवादीची शाखा आहे. त्या गावातील एखादा प्रदेशाध्यक्ष असेल, खासदार-आमदार असेल, प्रदेश, जिल्हा कार्यकारिणीमध्ये असेल तर विचाराचे धन वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना वैचारिक मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गावात एकत्र बसायचे. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असले तरी त्यांनी कासेगावात जाऊन मांडी घालून बसलंच पाहिजे. अजितदादांनी (Ajit Pawar) काटेवाटीत जाऊन तेथील सेवादलाच्या अध्यक्षासमोर बसणं अभिप्रेत आहे. जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, भुजबळसाहेबांनी गेलं पाहिजे, असं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं.

गावातील एकाला सेवा दलाचा अध्यक्ष म्हणून निवडायचा आहे. सेवा दलाचे कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी असतात. तुम्ही आणि आम्ही सर्वांनी पहिल्यांदा सेवादलाचे काम केले पाहिजे. ते करण्यासाठी प्रत्येक गावात सेवादल असायला हवी. सेवादलाचे ते अध्यक्ष महिन्यातून एकदा स्थानिक, राज्यातील, देशातील घडामोडींची चर्चा केली पाहिजे. हे बंधन आता प्रत्येकाला असणार आहे. तुम्ही पक्षात काम करत असेल तर त्या गावात जावेच लागेल, असे पाटील यांनी नमूद केले.

महाराष्ट्रात ही नवी प्रथा आपण सुरू करत आहे. विचारावर आधारीत कार्यकर्ता घडवायचा असेल, आपल्या गावात जायला हवे. तुम्ही मार्गदर्शन करू नका, तरूणांचे ऐका. महाराष्ट्रात नवी पिढी घडवायची आहे, असे पाटील म्हणाले. शरद पवार यांच्यासारखं उत्तुंग व्यक्तीमत्व असताना पुढील काळात राज्यातील सर्वात मोठा पक्ष आपल्याला उभा करायचा आहे. आपण जागा किती लढवू हे महत्वाचं नाही. पण सर्वाधिक जागा आपल्या पक्षाच्या हव्यात, असं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com