Kirit Somaiya : असे आहेत किरीट सोमय्यांचे नव्या वर्षातले नवे संकल्प !

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०२२ ला गुड बाय करत 2023 या नव्या वर्षात नवे संकल्प केले आहेत.
BJP Leader Kirit Somaiya Latest News
BJP Leader Kirit Somaiya Latest NewsSarkarnama

Kirit Somaiya News : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०२२ ला गुड बाय करत 2023 या नव्या वर्षात नवे संकल्प केले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी त्यांचे हे संकल्प त्यांच्या ट्विटवरही शेअर केले आहेत. सोमय्या यांनी नवीन वर्षातील आपले नवे निशाणे जाहीर केलेत. नवीन वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (Shivsena) या तिन्ही पक्षातील नेत्यांची नावं जाहीर करत त्यांनी निशाणा साधला आहेत.

नव्या वर्षात नवे घोटाळे बाहेर काढणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मविआच्या 5 नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांचं कुटुंबासह अनिल परब यांचं साई रिसॉर्ट प्रकरण, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते अस्लम खान आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाचा उल्लेख करत या सर्वांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

BJP Leader Kirit Somaiya Latest News
Shivsena News; भाजपच्या आमदारांनो श्रेय घेता तर निधी आणून दाखवा!

''नव्या वर्षात ठाकरे कुटुंबाचे 19 बंगलो. अनिल परब यांचा साई रिसॉर्ट, अस्लम शेख यांचे 49 स्टुडिओ, हसन मुश्रीफ आणि पेडणेकर यांचे मुंबई महापालिकेतील घोटाळा, SRA फ्लॅट्स. या गोष्टी नव्या वर्षात आपल्या निशाण्यावर असतील. असं सूचक ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अनेक घोटाळ्यांचे आरोप केले. इतकेच नव्हे तर, नेत्यांना अटक होण्याआधीच कोणत्या नेत्याला अटक होणार आहे. हेदेखील त्यांनी सांगितल, त्यांच्या भविष्यवाणी प्रमाणेच नेत्यांना अटका झाल्याचे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले. यातील अनेक घोटाळ्यांच्या चौकशा आजही सुरु आहेत. काही न्यायप्रविष्ट आहेत. असे असतानाही आता पुन्हा एकदा वर्ष संपत असले तरी सोमय्या यांनी आपण महाविकास आघाडीचा पिछा सोडणार नसल्याचेच संकेत दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com