Only BJP will remain in NDA: Vinayak Raut's reply to Amit Shah
Only BJP will remain in NDA: Vinayak Raut's reply to Amit Shah

'एनडीए'त केवळ भाजपच उरणार : विनायक राऊतांचे अमित शहांना प्रत्यूत्तर

श्री. राऊत म्हणाले, "नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे उद्‌घाटन करण्यास आलेल्या शहा यांना शिवसेना आणि मुख्यमंत्री यांच्या पलीकडे विषयच सापडला नाही. अर्थात देशाच्या गृहमंत्री यांना मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याची वेळ येते, यातच मुख्यमंत्री ठाकरे यांचे यश आहे. स्वार्था पुरते दुसऱ्याला वापरून घ्यायचे आणि विश्‍वासघात करायचा, अशी ख्याती आहे.

ओरोस : स्वार्था पुरते दुसऱ्याला वापरून घ्यायचे आणि विश्‍वासघात करायचा, अशी भाजपची ख्याती आहे. अटलबिहारी, प्रमोद महाजन यांनी 33 पक्षांचा समन्वय साधुन स्थापन केलेल्या एनडीएमधील अकाली दल सारखे पक्ष मंत्रीपदाचा त्याग करून गेले. सर्वच पक्ष सोडून गेले असून एनडीएमध्ये केवळ भाजप उरणार आहे. यावरून कृतघ्न कोण ?' हे स्पष्ट आहे, असे प्रत्यूत्तर शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी आज दिले. 

तळगाव येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार राऊत यांनी गृहमंत्री शहा यांनी केलेल्या टिकेला प्रत्यूत्तर दिले. सिंधुदुर्गात आलेले केंद्रीय गृहमंत्री सिंधुदुर्ग, महाराष्ट्राला काहीतरी देतील, त्या अनुषांगिक बोलतील, केंद्राकडे महाराष्ट्राचे जीएसटीचे अडकलेले साडे सत्ताविस हजार कोटी तसेच अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती मदतीसाठी प्रलंबित असलेल्या हजारो कोटी रूपयांच्या प्रस्तावावर बोलतील, असे अपेक्षित होते.

मात्र त्यांचा दौरा केवळ शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेण्यासाठीच आयोजित होता, असे त्यांच्या भाषणावरुन स्पष्ट होत आहे, अशी टिकाही श्री. राऊत यांनी केली. ते म्हणाले, "नरेंद्र मोदी यांचा फोटो ज्या प्रचार सभेत होता त्याच बॅनरवर बाळासाहेब याचा फोटो होता. त्यामुळे मोदींमुळे शिवसेनेचे आमदार निवडून आले, असे म्हणणे चुकीचे आहे. प्रचार सभेत भांडत बसायचे नसते.

त्यामुळे शहा यांनी दिलेल्या शब्दाचा आम्ही उच्चार केला नाही किंवा फडणवीस यांच्या नावाला विरोध केला नव्हता. दिलेला शब्द भाजपने पाळावा म्हणून त्यांच्या पाठिमागे आरती घेवून फिरणे आम्हाला योग्य वाटले नाही. मोदी, शहा यांच्या मगृरी स्वभावाला वेसन घालणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीचा पर्याय स्वीकारला. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर करणाऱ्यांकडून आम्हाला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही.''

 श्री. राऊत म्हणाले, "नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे उद्‌घाटन करण्यास आलेल्या शहा यांना शिवसेना आणि मुख्यमंत्री यांच्या पलीकडे विषयच सापडला नाही. अर्थात देशाच्या गृहमंत्री यांना मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याची वेळ येते, यातच मुख्यमंत्री ठाकरे यांचे यश आहे. स्वार्था पुरते दुसऱ्याला वापरून घ्यायचे आणि विश्‍वासघात करायचा, अशी ख्याती आहे.

अटलबिहारी, प्रमोद महाजन यांनी 33 पक्षांचा समन्वय साधुन स्थापन केलेल्या एनडीएमधील अकाली दल सारखे पक्ष मंत्रीपदाचा त्याग करून गेले. सर्वच पक्ष सोडून गेले असून एनडीएमध्ये केवळ भाजप उरणार आहे. यावरून कृतघ्न कोण ?' हे स्पष्ट होत आहे.'' 

बाळासाहेबांमुळेच मोदी, शहा 

शहा यांनी ज्याला बंद खोली म्हटली आहे ते संपूर्ण देशाचे दैवत असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर आहे. या मंदिरात अनेक चर्चा झाल्या. स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे जीवंत नाहीत; परंतु लालकृष्ण अडवाणी त्याचे साक्षीदार आहेत. त्याच दैवत असलेल्या बाळासाहेब यांच्या आशीर्वादामुळे नरेंद्र मोदी, शहा आज दिसत आहेत. गोध्रा हत्याकांड प्रकरणी बाळासाहेब पाठीशी राहिले नसते तर आज हे दोघी कुठे असते, ते समजू शकले नसते, असा आरोप यावेळी खासदार राऊत यांनी केला. 

शहा, राणे जोडी  लाईफटाईम रहावी 
अमित शहा व नारायण राणे या दोन समविचारी व्यक्ती आहेत. या दोन्ही व्यक्ती एकत्र आल्या आहेत. आता या दोघांनी लाईफटाईम एकत्र रहावे, अशा खोचक शुभेच्छा यावेळी खासदार राऊत यांनी दिल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com