Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. काल सागर या शासकीय निवासस्थानी ही भेट झाल्याचे समजते. साम टीव्ही या वाहिनेने याबाबचे वृत्त दिले आहे. भाजपच्या या दोन्ही बड्या नेत्यांच्या भेटीला फार मोठा राजकीय अर्थ असल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. येणाऱ्या राज्यसभा सदस्यत्वाच्या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे, असे संकेतही मिळत होते. त्यामुळे या भेटीने पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)
मागील काही काळापासून फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली होती. दोघांमध्ये सुप्त राजकीय संघर्ष सुरु असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अखेर राजकीय समेट झाल्याची चिन्हे दिसत आहेत. (Latest Political News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. काल फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती पंकजा मुंडे आणि फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.
(Edited By - Chetan Zadpe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.