Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दर कपातीची चर्चा प्रत्येक्षात येणार का?

Petrol-Diesel Price : लवकरच पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार?
Petrol Diesel prices hike News
Petrol Diesel prices hike NewsSarkarnama

मुंबई : वाढत्या महागाईने देशातील सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहेत. यात घरगुती गॅसचे दर देखील 1 हजारांवर आहे. याचवेळी पेट्रोल डिझेलचे दर देखील कमी व्हावेत, अशी मागणी जोर धरु लागली आहे. याचदरम्यान, आता सामान्य जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता असून याबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. लवकरच पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. (Petrol-Diesel Price News)

मागील वर्षी पेट्रोल डिझेलच्या (Petrol-Diesel) दरात सातत्याने वाढ करण्यात होताना होती. मात्र, मे महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर (Crude Oil) नीच्चांकी पातळीवर असतानाही सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळालेला नव्हता. राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस (Fadnavis) सरकारने राज्यात पेट्रोल डिझेलचे दर कमी केले होते. पेट्रोल प्रति लिटर ५ रूपये तर डिझेल प्रति लिटर ३ रूपये स्वस्त केलं होते. आता पुन्हा एकदा इंधनाच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे.

Petrol Diesel prices hike News
Amol Kolhe : आत्मक्लेश आंदोलनावरून खासदार कोल्हे अन् रोहित पवारांमध्ये ट्विटरवॅार!

आंतरराष्ट्रीय (International) पातळीवर सातत्याने कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत आहे. देशात सध्या क्रुड ऑईलच्या किंमती 90 रुपये प्रति बॅरलवर व्यापार करत आहेत. सध्या या किंमती 82 रुपयांच्या आसपास आहेत. नोव्हेंबर महिन्यात क्रूड ऑईलच्या किंमतीत पुन्हा 7 टक्क्यांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात पाच रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे.

Petrol Diesel prices hike News
Narendra Modi : गुजरात निवडणुकीच्या मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींनी आईची भेट घेऊन घेतले आशीर्वाद

कच्च्या तेलाच्या किंमतीत मार्च महिन्यांपासून एकूण 27% घसरण दिसून आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरण होत आहे. परंतु, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काहीच बदल झालेला नाही. तेल कंपन्या नुकसानीचा दावा करत होत्या. पण त्यांचे नुकसान भरुन निघाल्याचा दावा करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत देशात पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात. याबाबतचा निर्णय तेल कंपन्या अंमलबजावणी करण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहीनीने दिले आहे. (Petrol-Diesel Price News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com