MNS Politics and Assembly election : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत पदाधिकारी मेळावा घेत, आगामी विधानसभा निवडणूक आपला पक्ष स्वबळावरच लढणार असल्याचं जाहीर केलं. युती करायची की नाही, कुणाबरोबर जायचं की नाही हे सगळं नंतर ठरवू, मात्र मनसेची सत्ता आली पाहीजे यासाठी आपण 225 ते 250 जागा लढवायच्या असल्याचं त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.
राज ठाकरे(Raj Thackeray) म्हणाले, ''निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच तिकीट मिळेल. तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कुणालाही तिकीट दिलं जाणार नाही. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे पदाधिकारी आणि आपले लोक सत्तेत बसवायचे आहेत. अनेकजण हसतील हसुदेत मात्र हे घडणार म्हणजे घडणार.''
मनसेने(MNS) 225 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची घोषणा केली असली तरी त्यांची ताकद ही महानगरांध्येच आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये मनसेच्या नेत्यांकडून निवडणूक लढण्याची तयारी देखील केली जात आहे. त्यामुळे मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या उमेदवारांमुळे मराठी मतांमध्ये फूट पडून त्याचा फटका उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला बसण्याचा धोका आहे.
दरम्यान, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत विधानसभेला होणार आहे. लोकसभेतील यशामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे लोकसभेला महायुतीला साथ देणारी मनसे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.