मुंबई : राज्यसभेत महाराष्ट्रातील प्रतिनिधीत्वाच्या ७ जागांसाठी २६ मार्च २०२० ला निवडणूक होणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. संसदेचे स्थायी सभागृह असणा-या राज्यसभेत एकूण १७ राज्यांतील ५५ सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२० (२, ९ आणि १२ एप्रिल) मध्ये संपत आहे. वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्रातील एकूण ७ सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२० ला संपत आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ५५ जागांसाठी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
असा असणार निवडणूक कार्यक्रम
महाराष्ट्रासह १७ राज्यांच्या राज्यसभेतील ५५ जागांसाठी २६ मार्च २०२० ला मतदान घेण्यात येणार आहे. ६ मार्चला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १३ मार्च असून १६ मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. १८ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर २६ मार्चला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजे दरम्यान मतदान घेण्यात येणार तर दुपारी ५ वाजता मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.