Ram Mandir Ayodhya : चलनात श्रीरामाचा फोटो असलेली 500 रुपयांची नवीन नोट ? काय आहे सत्य?

Rs 500 Notes Fake Photos Viral Featuring Lord Ram Ayodhya Temple : सोशल मीडियावर श्रीरामाचा फोटो असलेली पाचशेची नोट व्हायरल...
Rs 500 Notes Fake Photos
Rs 500 Notes Fake PhotosSarkarnama

Rs 500 Notes Fake Photos Viral :

अयोध्येत 22 जानेवारीला म्हणजे येत्या सोमवारी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या सोहळ्यापूर्वी सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. 500 रुपयाच्या नोटवर प्रभू श्रीराम आणि अयोध्येतील राम मंदिराचा फोटो असल्याचे नोटवर दाखवण्यात आले आहे. RBI येत्या 22 तारखेला नवीन नोट जारी करणार असल्याचा दावा या व्हायरल फोटोंवरून करण्यात आला आहे.

Rs 500 Notes Fake Photos
Congress Politics : ताईंच्या 'वर्किंग' स्टाइलवर भाई नाराज

ट्विटरवर अनेक पोस्टवर असे दावे करण्यात आले आहेत. फक्त ट्विटरवरच नाही तर फेसबुकवरही असे दावे करणारे पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. महात्मा गांधी आणि दिल्लीतील प्रतिष्ठीत लाल किल्ल्याचे फोटो हटवून प्रभू श्रीराम आणि अयोध्येतील राम मंदिराचे फोटो त्याजागी बदलल्याचे दिसत आहे. पण हे सर्व व्हायरल झालेले नोटांचे फोटो फेक म्हणजे खोटे आहेत. रिझर्व्ह बँकेकडून अशी कुठली नवीन नोट जारी करणार नाहीये.

काय आहे सत्य?

कथित नोट लक्षपूर्व बघितल्यास त्यात अनेक विरोधाभास दिसून येत आहेत. यात नोटेवरील फोटो डिजिटली एडिट केल्याचे दिसत आहे. फोटोंमध्ये प्रभू श्रीरामाच्या बाजूला अस्पष्ट पुसटसे चित्र दिसत आहे. नोटेवरील मूळ चित्र अस्पष्ट होऊन श्रीराम आणि राम मंदिराचे फोटो त्यावर लावण्यात आले आहेत. यामुळे हे व्हायरल झालेले फोटो फेक म्हणजेच खोटे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रभू श्रीराम आणि राम मंदिराचा फोटो 500 रुपयाच्या नोटवर छापल्याचा दावा हा खोटा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही अशा बदलाची कुठलीही माहिती आपल्या अधिकृत वेबसाइटवरून दिलेली नाही. तसेच बँकेकडून कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे 500 रुपयाच्या नोटवर महत्मा गांधी आणि लाल किल्ल्याचा फोटो कायम आहे. नवीन नोट किंवा नोटांमध्ये बदल करण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेकडून आधी माहिती दिली जाते. तसेच अधिकृत वेबसाइटवरही प्रकाशित केल्या जातात. त्यामुळे नोटचे व्हायरल झालेले फोटो हे फेक असल्याचे समोर आले आहे.

edited by sachin fulpagare

Rs 500 Notes Fake Photos
Thackeray Vs Narwekar : नार्वेकरांना घेरण्यासाठी ठाकरेंची मोठी खेळी; मुंबईनंतर आता पुण्यात भरवणार 'जनता न्यायालय' ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com