मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विधानसभेतील विजयानंतर त्यांच्या विधानपरिषदेत रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादीने संजय दौंड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने या जागेसाठी राजन तेली यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. माजी मंत्री पंडितराव दौंड यांच्या कुटुंबात यानिमित्ताने तब्बल ३० वर्षांनी आमदारकी मिळणार आहे.
संजय दौंड हे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे सुपुत्र आहेत. दोघा पितापुत्रांनी धनंजय मुंडे यांच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत अत्यंत मोलाची कामगिरी बजावली होती. तसेच त्याचवेळी मुंडेंनी शरद पवारांच्या करवी दौंड परिवाराला शब्द दिला होता.
दरम्यान आज (दि. १४) विधानभवनात महाआघाडीकडून संजय दौंड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडितराव दौंड काँग्रेसचे आमदार भाई जगताप, राजेश्वर आबा चव्हाण, राजेसाहेब देशमुख, गोविंद देशमुख, आदित्य पाटील यांसह आदि उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.