Nitin Bangude Patil|
Nitin Bangude Patil|

शंभूराज देसाईंना पुन्हा विधानसभेत जाऊ देणार नाही; नितीन बानगुडे पाटलांनी थोपटले दंड

Satara Politics| Nitin Bangude Patil| बानगुडे पाटील म्हणतात शिवसैनिक मात्र शिवसेनेसोबतच

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिवसेनेला (Shivsena) चांगलीच गळती लागली. मात्र या संकटातून स्वत:ला आणि पक्षाला सावरण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही कामाला लागले आहेत. यात विशेष म्हणजे या बंडखोरीनंतरही शिवसेनेतील काही नेते पदाधिकारी आजही उद्धव ठाकरेंसोबत असून त्यांनी बंडखोर आमदारांविरोधात सरसावले आहेत. शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी देखील आता राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आहे.

शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुका विधानसभा मतदार संघातील नवी मुंबई स्थित राहिवाश्यांचा मेळावा कोपरखैरणे मध्ये संपन्न झाला. शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. आगामी निवडणुकीत शंभूराज देसाई यांना चितपट करण्यासाठी नवी मुंबईतून शिवसैनिकांनी रणशिंग फुंकले आहे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या 40 पैकी 39 आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बघून घेतील मात्र शंभूराज देसाई यांना मात्र पाटण तालुक्यातील शिवसैनिक पुन्हा विधानसभेत जाऊ देणार नाही, असा निर्धार यावेळी पाटण तालुक्यातील शिवसैनिकांनी मेळाव्यात करण्यात आला. या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने बंडखोरी झाली असली तरी शिवसैनिक मात्र शिवसेनेसोबतच असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केली.

Nitin Bangude Patil|
OBC आरक्षण मिळणार की नाही ? ; आज 'सुप्रीम' सुनावणी

कोण आहेत नितीन बानगुडे पाटील ?

2014च्या विधानसभा निवडणुकीवेळी बानुगडे-पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचवेळी त्यांना सातारा आणि सांगली जिल्ह्याचं संपर्कप्रमुख पद देण्यात आलं. बानुगडे पाटील मोठे वक्ते आहेत. गर्दी खेचणारा वक्ता म्हणून शिवसेनेनं त्यांना पक्षात घेतलं. अल्पावधीतच शिवसेनेनं त्यांना पक्षाचे उपनेतेप दिलं. त्याशिवाय कृष्णा खोरे महामंडळाचं उपाध्यक्षपदही दिलं. 2019च्या निवडणुकीत त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदारही निवडून आणला."शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून बानुगडे पाटील यांची ओळख आहे. ते अभ्यासू नेते आहेत. बानुगडे यांच्या भाषणांमधील आक्रमकता, शब्दफेक आणि अभिनय कौशल्यामुळे लोक त्यांच्याकडे सहजपणे ओढले जातात. त्यामुळे त्यांच्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com