निकृष्ट महामार्गावरून शशीकांत शिंदे आक्रमक; 'रिलायन्स'वर कारवाईची मागणी....

सातारा-पुणे Satara-pune महामार्गाच्या highway दुरवस्था व सु्रू असलेली टोल TOll वसुली याबाबतचा मुद्दा आज आमदार शशीकांत शिंदे Shashikant shinde यांनी विधान परिषदेत Legislative Council उपस्थित केला.
Shashikant Shinde
Shashikant Shindesarkarnama
Published on
Updated on

मुंबई ः पुणे बंगळूर महामार्गावरील पुणे सातारा मार्गावर रिलायन्स कंपनीने चुकीच्या पध्दतीने केलेल्या कामामुळे रस्ता खराब झाला आहे. तरीही टोल आकारणी सुरू आहे. आनेवाडी व खेड शिवापूर टोल नाका बंद झाल्यास लाखो वाहनधारकांना याचा लाभ होणार आहे. चुकीचा रस्ता केल्याबद्दल रिलायन्स कंपनीवर कारवाई होणार का, असा प्रश्न आमदार शशीकांत शिंदे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात उपस्थित केला.

सातारा पुणे महामार्गाच्या दुरवस्था व सु्रू असलेली टोल वसुली याबाबतचा मुद्दा आज आमदार शशीकांत शिंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. त्याला बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिलासादायक उत्तर दिले. तर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तातडीने बैठक लावण्याची सूचन केली.

Shashikant Shinde
यापुढे जावळीत अधिक लक्ष देणार : शशीकांत शिंदे

आमदार शशीकांत शिंदे म्हणाले, जुन्या सातारा पुणे महामार्ग हा केंद्र सरकारच्या अखत्यारित असताना राज्य सरकारला त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. पण या मार्गाचा निकृष्ट दर्जाचा आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासोबत मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांनी संबंधितांवर कारवाईचे संकेत दिले होते. तर राज्य सरकारने न्यायालयात सध्या राज्य सरकारच टोलनाक्याचे पैसे वसुल करतंय, असे सांगितले आहे, ही वस्तुस्थिती आहे का, असा प्रश्न केला.

Shashikant Shinde
समृद्धी महामार्ग जाणार गडचिरोलीला : राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

रस्ता खराब असतानाही टोल आकारणी होत असून आनेवाडी व खेड शिवापूर टोल नाका बंद झाल्यास लाखो वाहनधारकांना त्याचा लाभ होणार आहे. या महामार्गाचे रूंदीकरण करून त्याची दुरूस्ती होणार का आणि चुकीच्या पद्धतीने रस्ता केल्याबद्दल रिलायन्स कंपनीवर कारवाई होणार का, असा प्रश्न आमदार शिंदे यांनी उपस्थित केला.

Shashikant Shinde
Video:भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन मागे, रामराजे निंबाळकरांची माहिती

त्यावर बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, ही सर्व वस्तुस्थिती आहे. महामार्गामध्ये ठेकेदारांनी चुकीचे काम केलेले आहे. मंत्री नितीन गडकरी यांचे या रस्त्याच्या कामांकडे लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वेळोवेळी बैठका होऊन त्यामध्ये याबाबतच्या सर्व गोष्टी निदर्शनास आणल्या आहेत. त्यामुळे याबाबत लक्ष घातले जाईल. जुना महामार्ग आहे, त्याची माहिती घेऊन दुरस्ती केली जाईल. राज्य शासनातर्फे केंद्र सरकारकडे याबाबतची विचारणा करून रस्ता दु्रूस्तीबाबतची मागणी केली तर बरे होईल, त्यासाठी आपण बैठक लावण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी सभापती रामराजेंनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com