शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांची गर्जना

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत.
Mahavikas Aghadi's Leader
Mahavikas Aghadi's LeaderSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यपालांना डिसमिस केल्याचे सांगणारा हा महामोर्चा आहे. शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. राज्यपालांना एक मिनिटसुद्धा खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. हे राज्यातील सरकार उलथवून टाकण्यासाठी टाकलेले पहिलं पाऊलं आहे. महाराष्ट्र्ची जनता हे सरकार उधळुन टाकण्यासाठी एका संधीची वाट पाहत आहे. यापुढे गावागावात असे मोर्चो निघतील. सर्व पक्ष या मोर्चात सहभागी झाले आहेत. तुम्हाला जमत नसेल तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आमच्या ताब्यात द्या, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. याच्या निषेधार्ष आज महाविकास आघाडीच्या वतीने महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस सह राज्यभरातील सर्वसामान्य जनता आणि अनेक लहान -मोठ्या पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com