शिवसेना शाखाप्रमुख चव्हाणांमुळे गहाळ झालेले 85 हजार रुपये हनीफला परत मिळाले !

अशा सुखद घटना केवळ चित्रपटात घडतात. इतकी मोठी रक्कम असूनही बॅग रक्कमेसह परत मिळाली यामुळे मी शेखर चव्हाण आणि चेंबूर पोलिसांचे खूप आभार मानतो.- हनिफ हसन शेखआदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्यावर केलेले संस्कार कधीच विसरू शकणार नाही. या संस्कार आणि शिकवणीमुळेच मला एका क्षणासाठीही या बेवारस बॅगेचा किंवा त्यातील रकमेचा मोह झाला नाही.-शेखर चव्हाण, शाखाप्रमुख, शाखा क्रमांक 152
Honest-shivsena-worker
Honest-shivsena-worker

मुंबई : मुंबईसारख्या शहरात रोज घडणाऱ्या हजारो गुन्ह्यांमुळे माणसांचा एकमेकांवरचा विश्वास उडत असताना काही सकारात्मक गोष्टी आजही माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याची ग्वाही देतात.

शिवसेना शाखाप्रमुखाने अशाच रीतीने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे एका इसमाला आपले गहाळ झालेले 85 हजार रुपये परत मिळाले. शिवसैनिकाने दाखविलेला प्रामाणिकपणा आणि पोलिसांची तत्परता यामुळे हा प्रकार घडला.

चेंबूरमध्ये राहणारे 53 वर्षीय हनिफ हसन शेख पत्नी आणि मुलीसह मॅंगलोरला आपल्या गावी जाण्यासाठी शनिवारी खासगी बसने निघाले. त्यासाठी चेंबूरच्या डायमंड गार्डन शेजारील खासगी बस थांब्यावरून त्यांनी बस पकडली. बस पकडण्याच्या घाईत एक बॅग चुकून बस थांब्यावरच राहिली आणि शेख कुटुंब मॅंगलोरला रवाना झाले.

याच ठिकाणी शाखाप्रमुख शेखर चव्हाण यांचे ट्रान्सपोर्ट व्यवसायाचे ऑफिस आहे. चार  तास उलटूनही या बॅगेला परत घेऊन जाण्यासाठी कोणी आले नसल्याची बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी चव्हाण यांना याबाबत माहिती दिली. गहाळ झालेली बॅग त्यातील ऐवजासह आपल्याकडे ठेवून घेणे चव्हाण यांना सहज शक्‍य होते पण त्यांनी प्रामाणिकपणाने पोलिसांशी संपर्क साधत संबंधित बॅगेची माहिती दिली.

चेंबूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन बॅगेतील सामानाची छाननी केली. त्यावेळी यात महिलेचे कपडे आणि 85 हजार रुपयांची रोकड सापडली. याच बॅगेत सापडलेल्या एका बिलावरून पोलिसांना हनिफ शेख यांच्या घराचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक मिळाला. बॅगेचा पंचनामा करून पोलिसांनी शेख यांच्याशी संपर्क साधला.

त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून आधी बॅगेची ओळख पटवून देण्यास सांगितले. शेख यांनी बॅगेत कपडे आणि रोकड असल्याची माहिती सांगितल्यावर पोलिसांना खात्री पटली. ज्यांच्या प्रामाणिकपणामुळे ही बॅग परत मिळाली, त्या शाखाप्रमुख शेखर चव्हाण यांच्या हस्तेच पोलिसांनी ही बॅग आणि रोकड शेख यांच्या हाती सुपूर्द केली.



 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com