ठाकरे सरकारने शिक्षकांना दिली 'गुड न्यूज'

दहावीच्या मूल्यांकनासाठी शाळेत जाण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी मागितली होती.
state government allows teacher to travel in local trains
state government allows teacher to travel in local trains

मुंबई : दहावीच्या मूल्यांकनासाठी शाळेत जाण्यासाठी शिक्षक (Teacher) व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना (Staff) लोकलने (Local train) प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली जात होती. अखेर राज्य सरकारने याला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे दहावीच्या (SSC)  मूल्यांकन प्रक्रियेचे रखडलेले काम सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या सात दिवसांपासून दहावीच्या मूल्यांकनासाठी शाळेत जाण्यासाठी शिक्षकांना अडचणी येत होत्या. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी नसल्यामुळे त्यांना शाळेत जाणे अडचणीचे ठरत होते. यामुळे मूल्यांकनाचे कामकाजही रखडले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने शिक्षकांना लोकल प्रवास करण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी याविषयी नुकतीच मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. 

शिक्षण क्रांती संघटना, शिक्षक परिषद, लोक भारती, शिक्षक सेना, भाजप शिक्षक सेल आदी संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी शिक्षकांना आता पास देण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयातून दहावीचे कामकाज पाहणाऱ्या शिक्षकांची नोंद करून त्यांना ऑनलाइन पद्धतीने हे पास दिले जातील. त्यांना नोंदणीनंतर एसएमएसद्वारे ही माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांना नोंदणी करावी लागणार आहे. 

याविषयी बोलताना शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस म्हणाले की, दहावीच्या मूल्यांकनासाठी शिक्षकांना शाळेत जाण्यासाठी लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी आम्ही केली होती. यावर निर्णय घेण्यास सुरुवातीला शिक्षण विभागाने दिरंगाई केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आता घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

शिक्षक परिषदेचे  कार्यवाह शिवनाथ दराडे म्हणाले की, शिक्षकांना लोकलने प्रवास कऱण्याची परवानगी मिळावी यासाठी आम्ही प्रत्येक रेल्वेस्थानकांवर आंदोलन केले. अखेर सरकारने त्याबाबत निर्णय घेतला असून, त्याचे आम्ही स्वागत करतो.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com