कोरेगाव भिमा दंगलप्रकरणी शरद पवार यांनी नोंदवली साक्ष

कोरेगाव भिमा दंगलप्रकरणी न्यायालयीन चौकशीसाठी न्यायमूर्ती जे. एन. पटेल आयोग नेमण्यात आला आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : कोरेगाव भिमा दंगल (Koregaon Bhima riot) प्रकरणी न्यायालयीन चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती जे. एन. पटेल आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सोमवारी साक्ष नोंदवली. कोरेगाव भिमा येथील हिंसाचार संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचं वक्तव पवार यांनी केलं होतं.

पुण्याजवळील कोरेगाव भिमा येथे एक जानेवारी 2018 मध्ये दंगल झाली होती. त्याच्या चौकशीसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने हा आयोग नेमला आहे. न्यायमूर्ती पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक नहे या आयोगाचे सदस्य आहेत. आयोगाने पवार यांच्यासह पुणे शहराचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रवींद्र सेनगावकर, पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनाही साक्ष नोंदवण्यासाठी नोटीस पाठवली आहे.

Sharad Pawar
गधे को दिया मान…गधा पहुँचा आसमान! चित्रा वाघ यांच्या मनातलं गाढव कोण?

शरद पवार यांनी कोरेगावची दंगल ही संभाजी भिडे (Sambhaji Bhide) आणि मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचे विधान केले होते. तसेच एल्गार परिषदेचा तपास पुणे पोलिसांनी योग्यरित्या केल्या नसल्याची टीका केली होती. त्यांच्या या विधानावरून त्यांना आयोगासमोर बोलविण्यात आले. वकील प्रदीप गावडे यांनी त्यांची साक्ष नोंदवण्याची मागणी केली होती.

काय आहे प्रकरण?

पेशवे विरुद्ध इंग्रज यांच्यात कोरेगाव येथे झालेल्या लढाईला 2018 मध्ये दोनशे वर्षे पूर्ण झाली होती. त्यामुळे तेथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनता जमली होती. त्या वेळी त्यांच्यावर हल्ला झाला आणि प्रत्युत्तरही देण्याचा प्रकार घडल्याचे पोलिस अहवालात म्हटले आहे. या प्रकाराने महाराष्ट्रातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

या दंगलीमागे शहरी नक्षली चळवळीचा हात असल्याचा आरोप तेव्हा पोलिसांनी केला होता. पुण्यातील शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेकडे (Elgar Parishad) त्यासाठी बोट दाखविण्यात आले होते. या साऱ्या घटनांवर शरद पवार आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या साक्षीतून प्रकाश पडण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांचीही या आयोगासमोर साक्ष झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com