Sanjay Raut Statement: ''आम्ही फडणवीसांच्या जवळचे; त्यांचं अंतरंग धगधगतंय, ते बोलतात एक...''; राऊतांनी वात पेटवली

Sanjay Raut On Devendra Fadnavis : ''इतका अपमान सहन करून ते उपमुख्यमंत्री झाले आहेत...''
Sanjay Raut- Devendra Fadanvis
Sanjay Raut- Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे बॅनर लागले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर बोलताना फडणवीसांनी आगामी २०२४ च्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढू आणि जिंकणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. यावर ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) खोटे बोलतात. त्यांच्या अंतरंगात काय ते आम्हाला माहिती, इतका अपमान सहन करून ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. बोलतात एक पण त्यांच्या अंतरंगात जी वेदना आहे ती जवळच्या लोकांना माहिती आहे. आम्ही त्यांच्या जवळचे आहोत. त्यांचे अंतरंग धगधगतंय असं राऊतांनी सांगितले. संजय राऊत यांनी मुंबईत बुधवारी(दि.२६) सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

Sanjay Raut- Devendra Fadanvis
Delhi Mayor Election : दिल्लीवर सलग दुसऱ्यांदा APP चा झेंडा ; महापौरपदी शैली ओबेरॉय बिनविरोध ; भाजपच्या शिखा रॉय...

संजय राऊतांचा 'हा' इशारा...

खासदार संजय राऊत यांनी यावेळी फडणवीसांना इशारा दिला आहे. आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत संयमाने आम्ही विधाने केली. पण तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर लक्षात घ्या, कागदावर तुम्ही शिवसेना वेगळी केली असेल पण त्या कागदालाही वाळवी लागलीय असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला.

तसेच महाराष्ट्रात शिवसेनेला सुपारी घेण्याची गरज भासली नाही. शिवसेना फोडायची गरज कोणाला पडली? तुमच्यात हिंमत असेल तर समोर या, सुपारी घेऊन हल्ले करू नका.देवेंद्र फडणवीसांनी सुपाऱ्या घेऊन बोलू नये. शिवसेना फोडायची गरज कोणाला पडली? तुमच्यात हिंमत असेल तर समोर या, सुपारी घेऊन हल्ले करू नका असंही राऊत यावेळी म्हणाले.

Sanjay Raut- Devendra Fadanvis
Sanjay Raut On Amit Shah: ''अमित शाह गृहमंत्री कमी आणि भाजपा नेते जास्त वाटतात,या देशाला...''; राऊतांचा घणाघात

राज्यातील शिंदे फडणवीस सरकार अस्थिर..

सरकार अस्थिर आहे. सोंगटे आणि गोटे हलवायचे असतील तर त्यासाठी ते महाराष्ट्रात येत असतील. अमित शाह हे गृहमंत्री कमी आणि भाजपा नेते जास्त वाटतात. या देशाला उत्तम गृहमंत्र्यांची गरज आहे. महाराष्ट्रालाही निष्पक्षपाती गृहमंत्र्यांची गरज आहे. पाठीमागे सरदार पटेल फोटो लावून चालत नाही असा टोला राऊतांनी शाह यांना लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com