Sanjay Raut News : 'आज ते तुमच्यासोबत आहेत तर उद्या आमच्याकडे येतील', एनडीए सत्तास्थापनेवर खासदार राऊतांचे सूचक विधान !

Congress Free India : नरेंद्र मोदी म्हणायचे मी काँग्रेसमुक्त भारत करणार. मात्र आम्ही सर्वांनी एकत्र मिळून भाजपाला बहुमत मुक्त केले आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.
Sanjay Raut, Narendra Modi
Sanjay Raut, Narendra ModiSarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशात आता भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए चे सरकार येणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची मोठी पिछेहाट झाली असून अनेकांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होणार असतील तरी हे सरकार चालविताना मोदी यांच्या नाकीनऊ येणार असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएने सत्तास्थापनेचा दावा केला आहे.यावर प्रतिक्रिया देताना खासदार राऊत म्हणाले, चंद्राबाबू आणि नितीश कुमार म्हणजे एनडीए का ? हे दोघे तर सगळ्यांचेच आहेत. आज ते तुमच्यासोबत आहेत तर उद्या आमच्याकडे येतील, हे एनडीए कुठे आहे, असे सूचक विधान राऊत यांनी केले. सरकार स्थापन होण्यापूर्वीच नरेंद्र मोदींच्या योजनांना विरोध होण्यास सुरूवात झाली आहे. अग्नीवीर योजनेला होणारा विरोध ही तर सुरूवात आहे. ज्यांच्या मदतीने मोदी सत्ता स्थापन करत आहेत, ते उद्या इतर योजनांनाही विरोध करतील.

केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक मुद्दे असे आहेत ज्यावर चर्चा सुरु आहे. त्यांना सरकार बनवायचे आहे बनवू द्या. पण मोदींकडे आणि भाजपाकडे (BJP) बहुमत नाही, त्यामुळे त्यांना इतरांच्या मदतीनेच आपला कारभार चालवावा, लागणार असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले. राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी म्हणायचे मी काँग्रेसमुक्त भारत करणार. मात्र आम्ही सर्वांनी एकत्र मिळून भाजपाला बहुमत मुक्त केले आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला. एनडीएमध्ये सहभागी असलेले चंद्राबाबू नायडू हे मुसलमानांच्या आरक्षणाच्या बाजूने आहेत. आता मोदी काय करतील? असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Sanjay Raut, Narendra Modi
Sanjay Raut On Kangana Ranaut : कंगना रनौत मारहाण खासदार राऊतांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, आईबद्दल बोलल्यावर राग..!

लोकसभेच्या ज्या जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे. त्या पक्षाच्या नेतृत्वाला दिल्लीत बोलविले जाते. त्यांचे हाय कमांड दिल्लीत आहेत. तेथे प्रत्येक पक्षाचे वरिष्ठ नेते त्यावर चर्चा करतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचा जिथे पराभव झाला आहे. त्याची माहिती गोळा केली जात असून त्याचे चिंतन करणार असल्याचे खासदार राऊत म्हणाले. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधा कसे लढायचे यावर चर्चा सुरू असून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut, Narendra Modi
Chandrababu Naidu-Nitish Kumar : मोदींसोबत राहून दोन्ही ‘बाबू’ राबवणार काँग्रेसचा अजेंडा?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com