कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य : म्हणाले, सीमावाद अस्तित्वातच नाही...

1960 साली मुंबईसह महाराष्ट्र मिळाला मात्र बेळगाव, निपाणी सारखे मराठी भाग कर्नाटकातच राहिले. हे भाग मिळविण्यासाठी मराठी भाषिकांचा संघर्ष सुरू आहे.
Basavraj Bommai
Basavraj Bommai Sarkarnama
Published on
Updated on

बेळगाव - भाषावार प्रांतरचना होण्यासाठी महाराष्ट्राने मोठा संघर्ष केला. 1960 साली मुंबईसह महाराष्ट्र मिळाला मात्र बेळगाव, निपाणी सारखे मराठी भाग कर्नाटकातच राहिले. हे भाग मिळविण्यासाठी मराठी भाषिकांचा संघर्ष सुरू आहे. असे असताना कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अजब विधान कर्नाटकातील एका पत्रकार परिषदेत केले. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ( The Chief Minister of Karnataka said, Karnataka took Belgaum by giving Solapur, Akkalkot ... )

शिवसेना नेते संजय राऊत यांनी कश्मीर फाईल्स पेक्षा बेळगांव फाईल्स गंभीर आहे. अशा आशयाचे व्यंगचित्र ट्वीट केले होते. या ट्वीटबाबत पत्रकारांनी बंगळुरू येथे पत्रकारांशी बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी हे विधान केले. बसवराज बोम्मई म्हणाले, केंद्र सरकारने 1956 साली केलेल्या भाषावार प्रांतरचनेत कन्नड भाषिकांची मोठी संख्या असलेले सोलापूर, अक्कलकोट परिसर महाराष्ट्राला दिला आणि त्याबदल्यात कर्नाटकला बेळगाव मिळाले. त्यामुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न अस्तित्वातच नाही, असा जावईशोध बोम्मई यांनी लावला आहे.

Basavraj Bommai
बेळगाव महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत  

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न कधीच संपुष्टात आलाय. महाराष्ट्रातील नेते तेथील समस्यांपासून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी हा वाद उकरून काढतात. सीमाप्रश्नी लवकरच महाराष्ट्राच्या विधीमंडळ अधिवेशनात ठराव संमत होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत, असा दावाही बोम्मई यांनी केला. या प्रतिक्रियेमुळे महाराष्ट्रातील मराठी भाषिकांच्या लढ्यावर बोम्मई यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com