पुण्यातील अवैध धंद्यावरून वळसे-पाटलांनी दिला पोलिसांना इशारा

नांदेड, किरकीटवाडी, नांदोशी व खडकवासला या चार गावांचा पुणे महानगरपालिका हद्दीत समावेश करण्यात आला आहे.
Dilip Valse-Patil
Dilip Valse-PatilSarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुणे शहरातील वाढलेल्या अवैध धंद्यांबद्दल आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली. या लक्षवेधीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले. ज्या पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध धंदे सुरु आहेत, तिथल्या पोलीस प्रमुखांची ही जबाबदारी आहे की त्यांनी ते अवैध धंदे बंद करावेत. संबंधित पोलीस प्रमुखांकडून माहिती घेऊन अवैध धंदे ताबडतोब बंद करण्यात येतील, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. पुणे शहरातील सर्व आमदारांना एकत्र घेऊन पोलीस प्रमुखांसोबत लवकरच बैठक घेतली जाईल. या परिसरात घडणारे गुन्हे कायमस्वरुपी कसे थांबवता येतील याकडे लक्ष दिले जाईल, असे गृहमंत्री पाटील यांनी सांगितले.

Dilip Valse-Patil
नंदकिशोर चतुर्वेदींचा मनसुख हिरेन तर केला नाही ना ; राणेंचा ठाकरेंना सवाल

खडकवासला परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी नांदेड, किरकीटवाडी, नांदोशी व खडकवासला या चार गावांचा पुणे महानगरपालिका हद्दीत समावेश करण्यात आला आहे. हवेली पोलीस स्थानकाच्या अखत्यारीत असलेल्या या गावांना आता नांदेड सिटी या नव्याने प्रस्तावित असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये वर्ग केले जाईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. तसेच राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही गावे पोलीस आयुक्त कार्यालयाला जोडावीत अशी मागणी सदस्य भीमराव तापकीर यांनी केली. मात्र भौगोलिकदृष्ट्या विचार करुन सिंहगडच्या अलीकडची गावे राजगड पोलीस ठाण्यात तर पलीकडची गावे हवेली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहेत, असे गृहमंत्री वळेसे-पाटील यांनी साहगितले.

Dilip Valse-Patil
मला बुजगावणे म्हणून विधानसभेत पाठवलेले नाही : चेतन तुपेंचा इशारा

विधानसगेतील या लक्षवेधीच्या चर्चेदरम्यान आमदार चेतन तुपे यांनी पुण्याच्या शहरी भागात नार्कोटिक्स नियंत्रण विभाग सशक्त करण्याची मागणी केली. सध्या लहान मुलेदेखील अमली पदार्थांच्या आहारी जात असून ते थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यासंबंधीची मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देत असताना गृहमंत्री म्हणाले की, हडपसर येथे दोन पोलीस स्थानके मंजूर करण्यात आली आहेत. जागा उपलब्ध झाल्यास पोलीस स्थानके लगेच सुरु करता येतील. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अमली पदार्थ विरोधी मोहीम चालवण्यासाठी पोलीस स्थानकात काही उपाययोजना करण्यासंबंधी सांगितले आहे. सध्या हे प्रायोगिक तत्त्वावर सुरु असून लवकरच याची अंमलबजावणी राज्यभर करण्यात येईल, असे गृहमंत्री वळेसे-पाटील यांनी स्पष्ट केले.

पुणे शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागांतील गावांमध्ये गुन्हेगारी मोठ्यासंख्येने वाढत आहे.त्यामुळे पुरेसे मनुष्यबळ व त्यासाठी लागणारी सर्व पायाभूत व्यवस्था उभी करण्याची गरज आहे. हडपसरला आणखी एका स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज होती. त्यानुसार पोलीस ठाण्याला मंजुरी मिळाली. मात्र, पुरेशी जागा उपलब्ध झाली तर हे पोलीस ठाणे बांधता येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com