Venugopal Dhoot : व्हिडीओकॉनचे वेणूगोपाल धूत यांचा अर्ज फेटाळला : हायकोर्टात आव्हान देणार!

Venugopal Dhoot : उच्च न्यायालयात तरी त्यांना दिलासा मिळतो की....
Venugopal Dhoot
Venugopal Dhoot Sarkarnama
Published on
Updated on

Venugopal Dhoot : आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज घोटाळ्याच्या प्रकरणात, बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. यानंतर व्हिडीओकॉन समूहाचे संस्थापक वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून मुंबईतून अटक करण्यात आली होती. धूत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. धूत यांच्या वकीलाकडून धूत यांच्यावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र हा अर्ज न्यायालयाने फेटाळला.

Venugopal Dhoot
Satara News: गद्दारांना धडा शिकविण्यासाठी लढा उभारावा लागेल... भास्कर जाधव

आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळ्याच्या प्रकरणी वेणूगोपाल धूत यांना अटक करण्यात आल्यानंतर, आपल्यावरची ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी वकीलांमार्फत केला होता. मात्र मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआयन न्यायालयाने धूत यांचा हा दावा फेटाळून लावत, याबाबतचा त्यांचा अर्ज नाकारला आहे. यामुळे धूत यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे.

Venugopal Dhoot
Ambadas Danve News : खोके अन् दलबदलू मंडळी, एक थाली के चट्टे बट्टे...

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआयन न्यायालयाने दिलेल्या या निकालाला, धूत हे उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. यामुळे आता उच्च न्यायालयात तरी त्यांना दिलासा मिळतो की, तिथे ही धूत यांची अडचण होणार, हे सुनावणी दरम्यान स्पष्ट होईल.

नेमकं काय आहे प्रकरण?

आयसीआयसीआय बँकेच्या वतीने व्हिडिओकॉन कंपनीला एकूण सहा कर्जे वितरीत करण्यात आली होती, यापैकी दोन कर्जांच्या प्रकरणात कोचर यांचा सहभाग असलेल्या बँकेतील कर्ज मंजूरी समितीने कर्जांना मा्न्यता दिली होती, असे सीबीआयने न्यायालयाला सांगितले.

‘न्यू पॉवर’ या कंपनीत दीपक कोचर आणि धूत दोघेही ५०-५० टक्क्यांचे भागीदार होते. दीपक कोचर या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. कोचर यांच्यासाठी धूत यांच्याकडून कंपनीचे संचालकपद सोडण्यात आले होते.धूत यांनी आपले २४ हजार ९९९ समभाग न्यू पॉवर या कंपनीत हस्तांतरीत केले होते. दीपक कोचर यांना व्हिडिओकॉनने सर्व प्रकारेसहाय्य करावे, यासाठीच हे कर्ज वितरीत करण्यात आले, असेही सीबीआयने न्यायालयात सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com