Ashadhi Wari 2023 : राज्य सरकारची मोठी घोषणा; वारकऱ्यांना मिळणार विमा संरक्षण, दर्शनाचा वेळही कमी होणार

Shinde- Fadanvis Govt: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.
Ashadhi Wari 2023 :
Ashadhi Wari 2023 :

Shinde- Fadanvis Govt Decision for Warkari : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत (Ashadhi Wari) सहभागी झालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारने विमा संरक्षण देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी "विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना" लागू करण्याची घोषणा केली आहे.

या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण मिळेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबवली येईल. वारीच्या दरम्यान जर एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. (State Govt)

Ashadhi Wari 2023 :
Nagpur Congress News : राष्ट्रवादी काॅंग्रेस सतत तीन वेळा अपयशी, हिंगण्यावर कॉंग्रेसने ठोकला दावा !

तसेच, जर एखाद्या दुर्घटनेत कायमचे अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये आणि आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च राज्य सरकारकडून केला जाणार आहे. गेल्या काही वर्षांत वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटनांमध्ये वारकरी जखमी झाल्याच्या किंवा वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्यासाठी राज्य सरकारकडून या योजनेची घोषणा करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Politics)

यात्रा कालावधीत 30 -30 तास दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेत उभे राहावे लागते.हा दर्शन रांगेतील वेळ सात-आठ तासांनी कमी होणार आहे. यासाठी निरीक्षक नेमण्याची योजना जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आणली आहे. या योजनेनुसार, संपूर्ण दर्शन रांगेत प्रत्येकी 50 मीटरवर निरीक्षक नेमण्यात येणार आहे.जर रांगेत एखाद्या ठिकाणी काही गडबड दिसून आली तर तिथे सुरक्षा पथकाच्या माध्यमातून घुसखोरी रोखली जाईल. या व्यवस्थेमुळे दर्शनाची रांग न थांबता वेगाने पुढे पुढे सरकेल, आणि रांगेतील जवळपास 7 ते 8 तसांचा वेळ होईल. (Ashadhi Wari 2023)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com