Sharad Pawar News : लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवारच राष्ट्रवादी काँग्रसच्या अध्यक्षपदी राहणार?

NCP Activist : राष्ट्रवादी पक्षात कार्याध्यक्ष पदाची नेमणूक होण्याची शक्यता
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar May Continue President of NCP : शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगती' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन मुंबईत मंगळवारी (ता. २) पार पडले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते.

पवारांच्या या निर्णयाला राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. तसेच पवारांनी आपला निर्णय मागे घेतला नाही तर ६ मे पासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर शरद पवार लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : पवारांच्या भूमिकेने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित; म्हणाले, "तुमच्या भावना दुर्लक्षित होणार नाहीत !"

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार (Sharad Pawar) कायम राहणार आहेत. तर राष्ट्रवादी पक्षात दैनंदिन कामकाजासाठी कार्याध्यक्ष नेमण्याची शक्यता आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, आज गुरुवारी (ता. ४) दुपारी शरद पवारांनी कार्यकर्त्यांना भेटून आश्वस्त केले होते. त्यानंतर पवारच अध्यक्षपदी कायम राहण्याची माहिती येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रसचे (NCP) अध्यक्षपदी नेमण्यासाठी पक्षातील नेत्यांची एक समिती स्थापन केली आहे. ती समिती शुक्रवारी (ता. ५) निर्णय देण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच पवार हेच अध्यक्षपदी राहणार आहेत. तसेच दैनंदिन कामकाजासाठी कार्याध्यक्ष पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. या पदाववर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची नेमणूक होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar News : तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता होती; पण...: शरद पवार राजीनाम्यावर दोन दिवसांनंतर बोलले

दरम्यान, पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्याच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. तसेच राज्यभरातून अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामेही देण्यास सुरूवात केली होती. मुंबईतील (Mumbai) वाय. बी. सेंटर परिसरात तीन दिवसांपासून कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. तसेच ६ मे पासून आमरण उपोषणाचाही इशारा दिला होता.

कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पवारांनी दोन दिवसानंतर तुमच्यावर असे बसण्याची वेळ येणार नाही, असे विधान केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. आता पवारच अध्यक्षपदी राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com