BJP-Shivsena Politics| शिवसेनाचा मुख्यमंत्री होणार का? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

Uddhav Thackeray| Sanjay Raut| मला शिवसेना वाढवायची आहे, मी माझं दुकान बंद करणार नाही.
Uddhav Thackeray| Sanjay Raut|
Uddhav Thackeray| Sanjay Raut|

मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शित झाला. दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी मध्यावधी निवडणूका लावा, शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवतो, असं खुलं आव्हान भाजपला (BJP) दिलं आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल का? असा सवाल संजय राऊतांनी विचारला, ''का नाही होणार? मी शिवसेना प्रमुखांना शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन असं वचन दिलं होतं. तसं बघितलं तर आजही ते वचन अर्धवट आहे. खरं पाहता शिवसेना प्रमुख्यांना दिलेलं वचन ते आजही कायं आहे. कारण मी मुख्यमंत्री होणार असं मी कधीही बोललो नव्हतो. मी हे करणार नव्हतो, पण ठरलेल्या गोष्टी नाकारल्यानंतर मला हे आव्हान स्वीकारावं लागलं, पण मुख्यमंत्री होण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. म्हणून मला ते आव्हान स्वीकारावं लागलं. मी अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो, पण मला सत्तेची चटक नाही लागली.'' असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

Uddhav Thackeray| Sanjay Raut|
Shiv Sena Vs Shinde : भाजपचा प्लॅन `बी` तयार ; बंडखोरांनी `धनुष्य बाण` गमावला तरी...

''मला शिवसेना वाढवायची आहे, मी माझं दुकान बंद करणार नाही. ज्यांना मी आपले मानले, तेच सोडून गेले. म्हणजेच ती माणसं कधीच आपली नव्हती . त्यांच्याबद्दल मला वाईट वाटण्याचे कारण नाही. महाविकास आघाडीच्या प्रयोगाचे लोकांनी स्वागतच केले. मी वर्षा सोडताना महाराष्ट्रात अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. कोणत्या मुख्यमंत्र्यांना असे प्रेम मिळतं? पण त्या अश्रूंचे मोल मी वाया जाऊ देणार नाही !'' असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

देशातील सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्ष, प्रादेशिक पक्ष संपविण्याचे कारस्थान सुरू आहे. महाराष्ट्रातही सध्या तशीच परिस्थिती आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षाची भीती वाटायला लागली असेल तर तो त्यांचा कमकुवतपणाच म्हणावा लागेल. पण प्रत्येक वेळी विजय मिळेलच, असा लोकशाहीचा अर्थ होत नाही. शिवसेना, काँग्रेस, भाजप कुठलाही पक्ष असो, त्यांना प्रत्येकवेळी विजय मिळतोच असं होत नाही. हार-जीत सर्वांचीच होत असते, त्यातून नवीन पक्षही उदयाला येत असतात. तेही काही काळ चमकून जातात. हीच तर लोकशाहीची गंमत आहे. पण सर्वकाही तुमच्या बुडाखाली ठेवायचे अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा येते, तेव्हा त्यांना विरोधी पक्षाची भीती वाटायला लागते, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला आहे.

मीही अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो. आज नाही, पहिल्यासारखाच आजही तुमच्यासमोर बसलो आहे. काय फरक पडला? सत्ता येत-जात असते. पण माझ्यासाठी असली-नसली तरी फरक पडत नाही. दिवंहत अटलबिहारी वाजपेयीजी एकदा बोलले होते, 'सत्ता आती है, जाती है. लेकीन देश रहना चाहिये.' देश राहण्यासाठी सगळ्या पक्षांनी मिळून काम करायला हवे, आपणच देशासाठी काम नाही केले तर आपणच आपल्या देशाचे शत्रू आहोत. कारण आजही देशाला अनेक प्रश्न भेडसावत आहेत. सध्या रुपयाची किंमत ढासळली आहे. महागाईने उच्चांक गाठलाय. बेरोजगारी वाढली आहे. अशा सगळ्या गोष्टींकडे कुणाचे लक्ष नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com