अजितदादा कर्जतमधून लढण्याची शक्यता नाही ; मग साखर पेरणी कोणासाठी ?

ajit pawar and ncp
ajit pawar and ncp

नगर  :   राष्ट्रवादी काॅग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून लढणार असल्याची चर्चा मतदारसंघात झाली. सोशल मीडियावर ही चर्चा गाजलीही पण तशी शक्यता नसल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. 


अंबालिका साखर कारखान्याच्या निमित्ताने राशीन (ता. कर्जत) परिसरावर अजितदादा अधिक मेहेरबान आहेत. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमातही त्यांनी कर्जत-जामखेडकडे माझे विशेष लक्ष असल्याचे सांगितल्याने त्यांच्या उमेदवारीची चर्चा झाली खरी.  

 पण तसे होणार नसल्याचे समजते. याला राष्ट्रवादीचे तालुक्यातील नेते पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र गुंड यांनीही दुजोरा दिला.

अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राशीनचा अंबालिका साखर कारखाना सध्या सुरू आहे. या कारखान्याच्या निमित्ताने बहुतेक वेळा शनिवारी किंवा रविवारी अजित पवार यांची कारखान्याला भेट असते. त्यांनी या परिसराचा विकास घडवून आणला आहे. 

याबरोबरच या परिसराच्या विकासासाठी आपण कायम प्रयत्नशील असल्याचे ते आवर्जुन सांगतात. मागील दोन्ही विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची या मतदारसंघात सरशी आहे.

शिवाय सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रा. राम शिंदे यांच्याकडून कामांचा सपाटा सुरू आहे. अशा स्थितीत या भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणे राष्ट्रवादीला नक्कीच जड  जाणार आहे.पण अजित दादांच्या मतदारसंघातील फेऱ्या वाढल्याने  भाजपचा गड राखण्यासाठी प्रा. राम शिंद यांचे कार्यकर्तेही सावध झाले आहेत.

राष्ट्रवादी काॅग्रेसकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड या विधानसभेची तयारी करीत आहेत. जिल्हा परिषदेतील कामाच्या अनुभवाची शिदोरी त्यांच्याकडे आहे. राष्ट्रवादीने त्यांना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदावर संधी दिली आहे .

अजितदादा लढले तर आनंदच  : गुंड
अजितदादा कर्जत-जामखेडमधून लढणार असल्याची अफवा पसरली आहे. कारखान्याच्या निमित्ताने त्यांची या मतदारसंघात कायम ये-जा असली, तरी त्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. जरी त्यांनी या मतदारसंघातून उमेदवारी केली, तर आनंदच आहे. आम्ही तितक्याच ताकदीने सहकार्य करू, असे   राष्ट्रवादी काॅग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com