अडथळा दूर झाल्याने जिल्ह्यात कॉंग्रेसची लाट: बाळासाहेब थोरात; नामोल्लेख टाळून विखेंवर टीका

"जिल्ह्यात कॉंग्रेसची लाट आली आहे. पक्षात अनेक तरुण प्रवेश करीत आहे. नवीन तरुणांना संधी प्राप्त होत आहे. पक्षाला ज्यांनी सोडले, ते फसले. सत्ता म्हणजे सर्व काही नसते. पक्षाची विचारधारा महत्त्वाची असते. पक्षात असलेला अडथळा दूर झाल्याने कार्यकर्त्यांना वाट मोकळी झाली आहे,'' अशी टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विखे कुटुंबीयांचा नामोल्लेख टाळत केली.
अडथळा दूर झाल्याने जिल्ह्यात कॉंग्रेसची लाट: बाळासाहेब थोरात; नामोल्लेख टाळून विखेंवर टीका

नगर : "जिल्ह्यात कॉंग्रेसची लाट आली आहे. पक्षात अनेक तरुण प्रवेश करीत आहे. नवीन तरुणांना संधी प्राप्त होत आहे. पक्षाला ज्यांनी सोडले, ते फसले. सत्ता म्हणजे सर्व काही नसते. पक्षाची विचारधारा महत्त्वाची असते. पक्षात असलेला अडथळा दूर झाल्याने कार्यकर्त्यांना वाट मोकळी झाली आहे,'' अशी टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विखे कुटुंबीयांचा नामोल्लेख टाळत केली.

जिल्हा कॉंग्रेस समिती व संलग्नित सर्व आघाड्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शहरातील तुषार गार्डन येथे रविवारी झाला. आमदार भाऊसाहेब कांबळे व सुधीर तांबे, नूतन जिल्हाध्यक्ष करण ससाणे, जिल्ह्याचे निरीक्षक शरद रणपिसे, माजी खासदार दादा पाटील शेळके, तसेच विनायक देशमुख, राजेंद्र नागवडे, सबाजी गायकवाड, उबेद शेख, दीप चव्हाण, बाजीराव खेमनर, प्रताप शेळके, किरण पाटील, चंद्रकांत उजागरे, लता डांगे, डी. एम. कांबळे या वेळी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, "आमदार कांबळे नम्र व शांत व्यक्तिमत्त्व आहे. दुसऱ्यांसारखे ते चिमटे काढत नाहीत. कॉंग्रेसला चांगले दिवस येत आहेत. त्यामुळे पक्षात असल्याचा अभिमान बाळगा. नगर व शिर्डी मतदारसंघांतील दोन्ही उमेदवार निवडून आणायचे आहेत.''

प्रास्ताविकात आमदार तांबे म्हणाले, "देशात जे चांगले दिसत आहे, ते कॉंग्रेसने दिले आहे. वाईट दिसते ती भाजपची देण आहे.'' नागवडे, देशमुख, शहाजी भोसले, ससाणे, सत्यजित तांबे आदींनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी राशीन, जामखेड, पाथर्डी आदी ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी आभार मानले.

त्यांची जागा दाखवून दिली....
"मी कॉंग्रेसचा जिल्हाध्यक्ष असलो, तरी भाजपचा प्रचार करीन, असे जिल्हाध्यक्ष म्हणाले. पक्षश्रेष्ठींनी नूतन जिल्हाध्यक्षांची निवड करून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली,'' असे म्हणत थोरातांनी माजी जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com