नगर : केडगाव हत्याकांडातील सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मृत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांनी सुरू केलेले उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. अनिता ठुबे व सुनिता कोतकर यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केले आहेत. सुवर्णा कोतकर यांना अटक व्हावी, या मागणीवर हे कुटुंबिय ठाम आहेत.
केडगाव येथे मागील महिन्यात शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी आमदार संग्राम जगताप, नगरसेवक विशाल कोतकर यांच्यासह हत्या करणारे मुख्य आरोपी असे एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र इतर आरोपी फरार आहेत. तसेच पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास योग्य रितीने होत नसल्याचा आरोप करीत विविध मागण्यांसाठी शनिवार पासून दोन्ही मयत झालेल्यांच्या कुटुंबियांनी उपोषण सुरू केले आहे. संजय कोतकर यांच्या घरासमोर कोतकर व ठुबे कुटुंबिय उपोषणास बसले आहेत.
काल सहायक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सायंकाळी कोतकर व ठुबे कुटुंबियांसोबत चर्चा केली. रात्री उशिरा शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनीही भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. पण अपर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार यांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे या कुटुंबियांनी सांगितले. तसेच पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्याविषयी तपासाबाबत हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी या कुटुंबियांनी केल्या. दरम्यान, रात्री अनिता ठुबे व सुनिता कोतकर यांची तब्येत खालावली. त्यांना अशक्तपणामुळे चकरा येऊ लागल्याने त्यांच्यावर तेथे उपचार करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.