मंत्री राम शिंदेंच्या चौंडीतील कार्यक्रमात गु्न्हा दाखल झालेले उद्धव ठाकरेंच्या भेटीला

मंत्री राम शिंदेंच्या चौंडीतील कार्यक्रमात गु्न्हा दाखल झालेले उद्धव ठाकरेंच्या भेटीला

बारामती शहर :  धनगर आरक्षणाबाबत शिवसेनेचे आमदार विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनात आवाज उठवणार आहेत. चौंडी येथे दगडफेकीत धनगर समाजाच्या युवकांविरुध्द लावलेले 307 कलम मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अशी ग्वाही शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिली.

या प्रकरणात सहभागी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांच्यासह काही युवकांनी आज मातोश्रीवर ठाकरे यांची भेट घेतली. त्या वेळेस ठाकरे यांनी ही ग्वाही दिली. 

चौंडी येथील प्रकारात पालकमंत्री राम शिंदे यांचे भाषण सुरू असताना गोंधळ झाला होता. तसेच काहींनी दगडफेक केली होती. याविरोधात धनगर समाजाच्या युवकांवर पोलिसांनी आकस ठेवून थेट 307 कलमान्वये कारवाई करुन महिनाभर तुरुंगात डांबले हा अन्याय असल्याचे किशोर मासाळ व सहका-यांनी सविस्तरपणे  ठाकरे यांच्या कानावर घातले. या प्रकरणी धनगर समाजाच्या युवकांची मुस्कटदाबी होत असल्यास सेना युवकांच्या पाठीशी असेल, येत्या अधिवेशनात सेना आमदार धनगर आरक्षणाबाबत विधीमंडळात आवाज उठवतिल, असेही ठाकरे म्हणाले. 

किशोर मासाळ, सुरज खोमणे, अँड.संतोष तावरे, राजन कोळेकर, अनिल मासाळ, संदीप मासाळ, नितीन मासाळ यांचा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री मुंबई येथे सत्कार करण्यात आला. धनगर आरक्षणाच्या मुद्यांवर पक्षभेद विसरुन आम्ही समाजाच्या पाठीशी राहू अशी ग्वाही ठाकरे यांनी दिल्याचे मासाळ यांनी सांगितले. 

यावेळी शिवसेना सचिव अनील देसाई,धनगर समाज संघर्ष समितीचे सुरेश कांबळे, काकासाहेब मारकड,बालाप्रसाद किसवे,भगतसिंग विरकर,डाँ प्रमोद गावडे आदि मान्यवर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com