माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे अपक्ष म्हणून शिर्डीतून लढणार

माजी खासदार पूर्वी शिवसेना आणि सध्या भाजपमध्ये असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभेत अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. जनतेच्या रेट्यामुळे मी निवडणूक लढवत असल्याचं वाकचौरे यांनी म्हटले आहे.
माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे अपक्ष म्हणून शिर्डीतून लढणार

शिर्डी : माजी खासदार पूर्वी शिवसेना आणि सध्या भाजपमध्ये असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभेत अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. जनतेच्या रेट्यामुळे मी निवडणूक लढवत असल्याचं वाकचौरे यांनी म्हटले आहे.

शिवसेना आणि काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांबद्दल जनतेची नाराजी असल्याने, मला ही निवडणूक लढवायची आहे, अशी भूमिका वाकचौरे यांनी घेतली आहे. भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेनेचे माजी खासदार असून, सध्या भाजपमध्ये आहेत. भाजप कोट्यातून साईबाबा संस्थानचं विश्वस्तपदही त्यांच्याकडे आहे. शिवसेनेनेकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा त्यांना होती. पण शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाच तिकीट दिलं. त्यामुळे वाकचौरे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

वाकचौरे यांच्या निर्णया मुळे शिर्डी लोकसभेत तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. वाकचौरे यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून रामदास आठवलेंचा पराभव केला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसमध्ये गेले होते. त्यांनी शिर्डी लोकसभा काँग्रेसकडून लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपच्या तिकीटावर २०१४ ची श्रीरामपूर विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यावेळी पराभव झाला.

सध्या त्यांच्याकडे साईबाबा संस्थानचे विश्वस्तपद आहे. शिवसेना,काँग्रेस, भाजपा आणि आता अपक्ष शिर्डी म्हणून ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com