गुजरातमध्ये काॅग्रेसच्या यशाने संगमनेरचे वजन वाढले

गुजरात निवडणुकीत काॅंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर सर्वसामान्य जनतेने विश्वास दाखविला आहे.भाजपच्या बालेकिल्ल्यात काॅंग्रेसने मारलेली मुसंगी महत्त्वाची असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रात आगामी विधानसभेसाठी काॅग्रेसला वातावण अधिक चांगले होणार असल्याचे मत आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले
Rahul-Gandhi---Thorat
Rahul-Gandhi---Thorat

नगर :  गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत काॅग्रेसने दमदार वाटचाल करीत ५८ वरून ८० जागा जिंकल्या.यामध्ये काॅग्रेसची विचारधारा, अध्यक्ष राहुल गांधी यांचा प्रचार व महाराष्ट्रातील नेते माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा विकास कामाचा अजेंडा महत्त्वपूर्ण ठरला.

त्यामुळे देशपातळीवर काॅंग्रेसमध्ये संगमनेरचे वजन वाढल्याची भावना नगर जिल्ह्यातील नेत्यांची झाली आहे.

गुजरात विधानसभेसाठी काॅग्रेसच्या उमेदवार निवड समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राला संधी देत अभ्यासू नेते म्हणून नगरच्या संगमनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड झाली होती.

त्यांनी योग्य उमेदवार निवडून विकासकामांचा अजेंडा गुजरातच्या जनतेसमोर मांडला. या समितीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांचाही समावेश होता.

 बाळासाहेब थोरात हे संगमनेर विधानसभा मतदार संघातून सलग सात वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आले आहेत. आपल्या अष्टपैलू व्यक्तीमत्त्वामुळे त्यांनी राज्यात कृषी, जलसंधारण, शालेय शिक्षण, पाटबंधारे, खार जमिन अशी महत्त्वाची पदे मंत्री असताना सांभाळली. यामुळे त्यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड सार्थ ठरल्याची भावना नगर जिल्ह्यातून व्यक्त होत आहे.

गुजरात निवडणुकीच्या काळात थोरात यांनी गुजरातच्या सर्व भागांचा दाैरा केला होता. राजकीय व्यक्ती, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अशा लोकांशी चर्चा करून सर्वसामान्यांची मतेही जाणून घेतली होती.

अहमदाबाद, दिल्ली येथे बैठका घेऊन भपकेबाजीला थारा न देता योग्य उमेदवारांची निवड केली. या दरम्यान काॅंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून उमेदवार ठरविले.

 प्रचार काळात राजकीय ध्रुविकरण होत असताना वाईट आरोपांनी ही निवडणूक गाजली. हार्दिक पटेल सिडी प्रकरण, आैरंगजेब, खिलजी आदी उपमांना जनतेने थारा दिला नाही.

फक्त भाषण हेच साधन असलेल्या पंतप्रधानांच्या वक्तव्यांना जनतेला आत्मपरीक्षण करायला लावले. या रणसंग्रामात थोरात यांनी मांडलेला विकास अजेंडा लोकांना भावला, असून त्यामुळे संगमनेरचे वजन देशपातळीवर वाढले असल्याच्या भावना नगर जिल्ह्यातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहेत..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com