आमदार लहामटेंनी अकोलेत राष्ट्रवादीची ताकद वाढविली, तालुकाध्यक्षपद झाले चुरशीचे 

माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांनी निवडणुकीच्या आधी अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस रिकामी केली होती, नंतर मात्र आमदार डॉ.किरण लहामटे यांनी तिला उर्जितावस्था आणून ते आमदार झाले. ज्या तालुक्यात राष्ट्रवादीचा सुपडासाफ झाला होता, त्याच तालुक्यात तालुकाध्यक्षपदासाठी चुरस वाढली, ही राष्ट्रवादीच्या दृष्टीने भूषणावह बाब ठरली आहे.
mla kiran lahamate makes ncp stronger in akole
mla kiran lahamate makes ncp stronger in akole

अकोले - माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांनी निवडणुकीच्या आधी अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस रिकामी केली होती, नंतर मात्र आमदार डॉ. किरण लहामटे यांनी तिला उर्जितावस्था आणून ते आमदार झाले. ज्या तालुक्यात राष्ट्रवादीचा सुपडासाफ झाला होता, त्याच तालुक्यात तालुकाध्यक्षपदासाठी चुरस वाढली, ही राष्ट्रवादीच्या दृष्टीने भूषणावह बाब ठरली आहे.

२०१९ची  विधानसभा निवडणूक लागली आणि अकोले तालुक्यात राजकीय भूकंप होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांनी आपल्या जवळपास सर्व कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला. या वेळी पिचड यांच्याबरोबर तालुकाध्यक्ष, महिलाध्यक्ष, युवक अध्यक्षासह सर्वच पदाधिकारी भाजपात गेल्याने राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्ष तालुक्यात रिकामा झाला होता. राष्ट्रवादी रिकामी होत असताना आमदार डॅा. किरण लहामटे, जेष्ठ नेते अशोक भांगरे यांनी खासदार शरद पवार यांचा हात धरून राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात प्रवेश केला. 

या वेळी पवार यांच्यावर प्रेम करणारी व काही पिचड विरोधक कार्यकर्ते राष्ट्रवादीत सक्रिय झाले. आमदार डॅा. लहामटे यांनी राष्ट्रवादितून विधानसभा लढवून विजयही मिळवला. या काळात अनेक नवे, जुने कार्यकर्ते राष्ट्रवादीत आले. निवडणुकीच्या वेळी विस्कटलेली राष्ट्रवादी संघटीत करण्याचे काम आमदार डॅा. लहामटे, अशोक भांगरे, अमित भांगरे याच्यासह स्थानिक कार्यकर्ते करत आहेत. निवडणुकीनंतर तालुका पदाधिकारी निवड होणार हे क्रमप्राप्त होते. मात्र विधानसभेला चार महिने होत आहेत. अद्याप तालुक्याची कार्यकारणी जाहीर नाही. पक्षाला अद्याप तालुकाध्यक्षही नाही, त्यामुळे पक्षाच्या ध्येयधोरणावर काम तालुक्यात राबविली जात नव्हती. अखेर चार महिन्यांनंतर पिचड यांच्या पक्षांतरानंतर रिकामी झालेली राष्ट्रवादी पुन्हा नव्याने उभी राहून आता तालुकाध्यक्ष, युवक अध्यक्ष आदी पदासाठी पक्षात रस्सीखेच सुरु झाली आहे. 

कोण होणार तालुकाध्यक्ष?
तालुकाध्यक्ष पदासाठी भानुदास तिकांडे, प्रा. संपत नाईकवाडी, प्रा. सुरेश खांडगे यांच्यासह पाच ते सहा, तर युवकाध्यक्षपदासाठी पदासाठी युवा नेते अमित भांगरे, अमित नाईकवाडी, संदिप शेणकर, महेश तिकांडे, सह काही कार्यकर्ते इच्छुक आहे. अध्यक्षपदासाठी जेष्ठ नेते मिनानाथ पांडे यांच्याही नावाची चर्चा आहे. एकूणच कार्यकर्ता राहिलेला नसलेल्या राष्ट्रवादीला पुन्हा संजीवनी आली असून, पदाधिकारी निवडीसाठी स्पर्धा सुरु झाली आहे. मागील डिसेंबर महिन्यात तालुकाध्यक्ष पदासाठी भनुदास तिकांडे याची निवड झाली होती, मात्र इतर इच्छुक गटातील कार्यकर्त्यांनी वरिष्ठांपर्यंत तक्रार करुनही निवड होऊ दिली नाही. त्यानंतर निवड प्रक्रिया बारगळली होती. आता सोमवारचा मुहूर्त लागला असून, शुक्रवारी सकाळी राजुर येथील शासकीय विश्रामगृहात आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांच्या प्रमुख उपस्थित बैठक होऊन ही निवड प्रक्रिया होणार आहे.

इतर सेलच्याही निवडी लवकरच
राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्षाची निवड सोमवारी (ता. 17) राजुर येथील शासकीय विश्रामगृहात होणाऱ्या बैठकीत करण्यात येणार आहे. सोमवारी तालुकाध्यक्ष निवड होवून युवक, महिला, अल्पसंख्याक अशा इतर विभागाच्याही निवड आठ ते दहा दिवसांत करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com