बबनराव पाचपुते यांनी आयुष्यभर वाळू चोरूनच राजकारण केले -आमदार जगताप 

jagtap-Pachpute
jagtap-Pachpute

नगर  ः श्रीगोंदे तालुक्यातील ज्येष्ठ नेते भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काल सकाळी आमदार राहुल जगताप यांच्यावर केलेल्या टिकेला जगताप यांनी एका पत्रकाद्वारे खरमरीत शब्दांत उत्तर दिले आहे. 


"मी केलेले विकासकामे पाचपुते यांना पाहवत नाहीत. त्यामुळे त्यांना पोटशूळ उठतो आहे. माझ्यावर वाळुचोरीचा आरोप करणाऱ्या पाचपुते यांनी आयुष्यभर वाळू चोरूनच राजकारण केले. ठेकेदारांच्या जीवावर त्यांच्या चुली चालू होत्या," अशा शब्दांत आमदार जगताप यांनी पाचपुते यांचा समाचार घेतला.


श्रीगोंदे येथे उपजिल्हा आरोग्यकेंद्र मंजुर झाल्यानंतर आमदार जगताप यांनी ही माहिती अधिकृतरित्या जाहीर केली. या केंद्रासाठी पालकमंत्री असताना पाचपुते यांनी पाठपुरावा केल्याचा दावा करून आमदार जगताप यांच्यावर टिकास्त्र  सोडले.याला उत्तर देताना आमदार जगताप यांनी पत्रक काढून खरमरीत शब्दांत उत्तर दिले.


" बबनराव पाचपुते यांच्या आरोळ्या म्हणजे बाैध्दिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. पाचपुते यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे बुडवून तळतळाट घेतला. तालुक्याचा विकास पाचपुते यांना पाहवत नाही. माझ्या विकासकामांत अडथळा आणण्यासाठी पाचपुते कायम काही ना काही आरोप करतात. त्यांनी तालुक्यासाठी कोणतेही कामे केली नाही. मी विरोधी पक्षात असूनही कामे करून घेतो."


पाचपुते-जगताप यांचे वैर दुसऱ्या पिढीतही 

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार राहुल जगताप व भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यात अनेक वर्षांपासून शीतयुद्ध सुरूच आहे. जगताप यांचे वडील (कै.) कुंडलिकराव जगताप यांच्या राजकीय प्रवासातही पाचपुते यांचा विरोध सर्वश्रूत होता.तोच कित्ता आता पुन्हा गिरविला जात आहे. आमदार जगताप व पाचपुते एकमेकांवर आरोप करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभू्मीवर या राजकीय युद्धाला जोर येणार असल्याचे कार्यकर्त्यांमधून चर्चिले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com