पारनेर (नगर) : पारनेर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे गणेश शेळके यांची, तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसची सुनंदा सुरेश धुरपते यांची निवड झाली.
यापूर्वी फक्त दोन सदस्य असूनही काँग्रेसचे राहुल झावरे सभापती होते. यावेळी मात्र विधानसभेत पराजय पत्कारावा लागला, तरी माजी आमदार विजय औटी यांनी आपली ताकद दाखवून दिली. दरम्यान, आमदार निलेश लंके यांच्या राजकीय डावात राष्ट्रवादीने व्हिप बजावल्याने उपसभापतीपद पारड्यात पडले.
पारनेर पंचायत समितीच्या सभागृहात आज निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले व सहायक निवडणूक अधिकारी किशोर माने यांच्याकडे सभापती व उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. सभापती पदासाठी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य गणेश शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या सुनंदा सुरेश धुरपते यांनी अर्ज दाखल केले, तर उपसभापतीपदासाठी काँग्रेसचे सदस्य दिनेश बाबर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनंदा धुरपते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस सदस्या रोहिणी संतोष काटे यांनी आपल्या सदस्याचा राजीनामा दिला होता, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस संख्याबळ कमी झाले होते.
कर्जुले ह्या गणाच्या शिवसेनेच्या सदस्या सरूबाई वाघ या राष्ट्रवादीच्या गोटात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे या सभापती व उपसभापती निवडीसाठी चुरस निर्माण झाली होती. निवडणुकीच्या वेळी सर्व दहा सदस्य हजर होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.