भाजपाचे 'माधव' समीकरण चालले नाही: रोहित पवार  

आपण निवडणुकीत दारूचा एक थेंबही वाटला नाही. पैसेही वाटले नाहीत.- रोहित पवार
भाजपाचे 'माधव' समीकरण चालले नाही: रोहित पवार  

जामखेड (नगर) : कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात पंचवीस वर्षात जी विकासाची कामे झाली नाहीत, ती आपण पाच वर्षात करणार आहोत. दोन्ही तालुक्यात पाणी आणण्याचा सर्वे सुरू झाला आहे. दीड महिन्यानंतर तो सर्वे आपल्या हाती येईल, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर आज (शुक्रवारी) आमदार रोहित पवार पहिल्यांदा जामखेड शहरात आले होते. यानिमित्ताने त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी चौकाचौकात 'जेसीबी' च्या माध्यमातून झालेली गुलालाची उधळण मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरली. तब्बल पन्नासहून अधिक जेसीबी मिरवणुकीत होते. नगर रोड पेट्रोल पंपापासून निघालेली ही मिरवणूक बीड रस्त्यालगत कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील जाहीर सभेने संपली. यावेळी प्रा.मधुकर राळेभात, दत्तात्रेय वारे,राजेंद्र कोठारी, सूर्यकांत मोरे, रमेश आजबे, पवन राळेभात, अमित जाधव अदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

यावेळी पवार म्हणाले,"आपण मतदारसंघांमध्ये विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. आपण निवडणुकीत दारूचा एक थेंबही वाटला नाही. पैसेही वाटले नाहीत. भाजपने मात्र दारू आणि पैसा वाटला, असा आरोप करून मतदारसंघात अवैधरित्या विकली जाणारी सर्व दारू आपण बंद करणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली. 

निवडणुकीच्या निमित्ताने विकासाचा मुद्दा निवडणुकीत प्रभावी ठरला. जातीपातीचा मुद्दा चालला नाही. भाजपाचे 'माधव' समीकरण चालले नाही. निवडणूक जातीय समीकरणाच्या पलीकडे गेली. आपण विकासाच्या मुद्द्यावर राजकारण केले. यापुढेही विकासाला प्राधान्य दिले जाईल. आपल्या मतदारसंघातील अंगणवाडी पासून माध्यमिक शाळेपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, सर्वांसाठी आवश्यक त्या शाळाखोल्या उपलब्ध असाव्यात. याकरता आपण प्राधान्य देणार आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com