शिर्डीत विखेंनीच भगवा फडकवला!

संगमेरमधून मताधिक्य म्हणजेच आमदार बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का आहे.
शिर्डीत विखेंनीच भगवा फडकवला!

नगर : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्याच लिड घेवून शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांचा विजय म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील यांचाही विजय मानला जातो आणि संगमेरमधून मताधिक्य म्हणजेच आमदार बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का आहे.

अंतीम फेरीत लोखंडे यांना ४ लाख ८६ हजार ८२० मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना ३ लाख ६६ हजार ६२५ मते मिळाली. लोखंडे यांना एकूण मताधिक्य १ लाख २० हजार १९५ चे मिळाले. अकोले तालुक्यातून मात्र कांबळे यांना ३१ हजार ६५१ एव्हढे मताधिक्य मिळाले. संगमनेर हा विधानसभा मतदारसंघ थोरात यांचा हक्काचा मानला जातो. आमदार कांबळे यांना थोरात यांनीच उमेदवारीसाठी ताकद दिली. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा विखे पाटील यांच्या हक्काचे पॉकेट आहे. मात्र विखे यांनी प्रवरा पॅटर्न राबवत अखेर लोखंडे यांना विजयी केले. संगमनेर मतदारसंघातून लोखंडे यांना ७ हजार ६२५ मतांची आघाडी राहिली. हा धक्का थोरात यांना आगामी विधानसभेला धोक्याची घंटा देणारा ठरला आहे.

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना या निवडणुकीत केवळ ३५ हजार ५२६ मते मिळाली. यापूर्वी ही निवडणूक जिंकूनही या निवडणुकीत त्यांचे पाणीपत झाले. ते भाजपमध्ये होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष राहून उमेदवारी केली. त्याचा परिणाम त्यांना आता विधानसभेतूनही बाजुला राहावे लागण्याची शक्यता आहे.

विधानसभा मतदारसंघानिहाय मिळालेली मते व लोखेंडे यांना मताधिक्य असे :
१) अकोले : लोखंडे - ४९५१४, कांबळे - ८११६५, मताधिक्य - नाही (कांबळे यांना ३१६५१)
२) संगमनेर : लोखंडे ८२२१६, कांबळे ७४५९१, मताधिक्य - ७६२५
३) शिर्डी : लोखंडे १०३७६१, कांबळे ४०८९०, मताधिक्य -६२८७१
४) कोपरगाव : लोखंडे ८८६४३, कांबळे ४९३४४, मताधिक्य - ३९२९९
५) श्रीरामपूर : लोखंडे ८६६३९, कांबळे ६५१८१, मताधिक्य -   २१४५८
६) नेवासे : लोखंडे ७२६७६, कांबळे ५२९४२, मताधिक्य - १९७३४
७) पोस्टल : लोखंडे ३३७१, कांबळे २५१२, मताधिक्य -८५९
एकूण : लोखंडे - ४८६८२०, कांबळे - ३६६६२५, मताधिक्य - १२०१९५ 
 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com