कर्डिले झाले फिट, विखेंचेही मिळाले सर्टिफिकेट

लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान भाजपचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात आमदार कर्डिले यांचे जावई असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप उमेदवार होते. त्यामुळे डाॅ. विखे यांचे काम कर्डिले करणार का, याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. निकालानंतर नगर शहरातून मोठे मताधिक्य मिळवित डाॅ. विखे विजयी झाले. असे असले, तरी कर्डिले यांनी विखे पाटील यांचे काम ऐनवेळी केले नसल्याच्या चर्चेला उधाण आले होते.
Sujay Vikhe - Shivaji Kardile
Sujay Vikhe - Shivaji Kardile

नगर : आगामी विधानसभेची उमेदवारी राहुरी मतदारसंघातून आमदार शिवाजी कर्डिले यांना मिळणार की नाही, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाल्यात जमा आहे. कारण काल मुख्यमंत्र्यांच्या सभेत डाॅ. सुजय विखे पाटील यांनी कर्डिले यांचे काैतुक करीत जनतेने भाजप व आमदार कर्डिले यांच्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. तसेच मुख्यमंत्र्यांनीही या मतदारसंघाला भरभरून देण्याची घोषणा केली. त्यामुळे आता कर्डिले यांची उमेदवारी पक्की मानली जाते.

लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान भाजपचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात आमदार कर्डिले यांचे जावई असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप उमेदवार होते. त्यामुळे डाॅ. विखे यांचे काम कर्डिले करणार का, याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. निकालानंतर नगर शहरातून मोठे मताधिक्य मिळवित डाॅ. विखे विजयी झाले. असे असले, तरी कर्डिले यांनी विखे पाटील यांचे काम ऐनवेळी केले नसल्याच्या चर्चेला उधाण आले होते. डाॅ. विखेही कर्डिले यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र, काल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत डाॅ. विखे यांनी कर्डिले यांचे काैतुक केले. आगामी काळात त्यांना साथ देण्याबरोबरच जनतेनेही कर्डिले यांनाच साथ देण्याचे आवाहन केले. त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघातून कर्डिले यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.

मुख्यमंत्र्यांची सभा फलदायी
मुख्यमंत्र्यांची राहुरी येथील सभा आमदार कर्डिले यांच्यासाठी फलदाई ठरली आहे. वांबोरी चारीसाठी भरघोस निधीचे आश्वासन मिळाल्याने या चारीच्या लाभक्षेत्रातील जनता खूष झाली आहे. या मतदारसंघातील बहुतेक गावे या चारीच्या क्षेत्राशी निगडीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही सभा फलदायी ठरल्याचे मानले जाते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com