इशारा मिळताच पिचड यांचा `अगस्ती` खडबडून जागा

..
vaibhav pichad
vaibhav pichad

अकोले : अगस्ती सहकारी साखर कारखान्याला जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रकल्पग्रस्ताच्या कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी कामावर घेणे तसेच रोजदारीवरील कामगारांना कायम करणे, या मागणीसाठी अन्नत्याग उपोषण सुरु करताच माजी आमदार वैभव पिचड यांचे वर्चस्व असलेला अगस्ती कारखाना प्रशासन खडबडून जागे झाले. उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी उपोषणस्थळी जाऊन दोन महिन्यांत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

अकोले तालुक्याची कामधेनू अगस्ती सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर प्रवेशद्वाराजवळच आज प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुबांसह उपोषणास बसले होते. या वेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात मागणी होती की अगस्ती सहकारी साखर कारखाना उभारणीवेळी १९९०-९१ दरम्यान राजकारणी, नियोजन मंडळ व प्रशासन यांना प्रकल्पग्रस्ताच्या प्रत्येकाच्या कुटुंबातील एका सदस्याला कारखान्यात कायमस्वरूपी कामाला घ्यावे, या अटीवर विश्वास ठेवून आम्ही आमची जमीन कारखान्याला कायम खरेदी दिली होती. परंतु अध्यक्ष व प्रशासनाने आश्वासनाची पूर्तता केली नाही. तर काही प्रकल्पग्रस्ताची मुले गेली १० ते १२ वर्षापासून रोजंदारीवर काम करत आहेत. तरी त्यांना कायमस्वरूपी कामावर सामावून घ्यावे व दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करुन प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील सदस्याना कायमस्वरूपी कामावर घ्यावे, अशी माहिती उपोषणकर्ते  संदीप शेणकर, सिद्धेश शेणकर, योगेश शेणकर, स्वप्निल शेणकर, विजय शेणकर, मंगेश शेणकर, गणेश नाईकवाडी आदिनी दिली. या उपोषणकर्तेची मध्यस्थी शिवसेनेचे शहरप्रमुख नितिन नाईकवाडी यांनी केली.

दोन महिन्यांत भरती होईल
दरम्यान, सकाळी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरु झाल्यानंतर कारखाना प्रशासनाने तात्काळ दखल घेत दुपारी कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, संचालक महेश नवले, मच्छिंद्र धुमाळ, अशोक देशमुख यांनी उपोषण स्थळी भेट देवून उपोषणकर्त्याशी चर्चा केली. साखर आयुक्ताकडुन कामगार भरतीवर बंदी आणली आहे. दोन महिन्यात बंदी उठली, की प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन गायकर यांनी दिले असल्याचे कारखान्याचे संचालक महेश नवले यांनी दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com