माजी खासदार वाकचौरे यांच्या घरी लगीनघाई 

मुंबई : शिर्डी येथील शिवसेनेचे माजी खासदार व नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले भाऊसाहेब वाकचौरे यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. त्यांचे चिंरजीव रोहित यांचा विवाह शुक्रवार ता. २० एप्रिल रोजी होत आहे.
Rohit & Pooja
Rohit & Pooja

मुंबई  :  शिर्डी येथील शिवसेनेचे माजी खासदार व नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले भाऊसाहेब वाकचौरे यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. त्यांचे चिंरजीव रोहित यांचा विवाह शुक्रवार ता. २० एप्रिल रोजी होत आहे. या लग्नाच्या गडबडीत सगळे कुटुंब व्यस्त झाले आहे.

स्वतः भाऊसाहेब वाकचौरे विविध मंत्री, आमदार - खासदार, अधिकारी यांना भेटून लग्नाची निमंत्रणे देत आहेत. या विवाहसंमारंभाचे निमंत्रण जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते,तसेच राज्यातील अनेक नेत्यांना देण्यात येत आहे. लग्नासाठी आवर्जून या, हा आग्रह सुद्धा ते करीत आहेत.  शिर्डी तेथील साईसृष्टी लाॅन्स (तीन चारी, शिर्डी कोपरगाव रोड) येथे सायंकाळी सात वाजता हा विवाह सोहळा होत आहे.
 
चिरंजीव रोहित यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिर्डी व कोपरगाव येथे झाले. त्यानंतर येवला एमबीए (मार्केटिंग) शिक्षण पूर्ण केले आहे.  वडिलांना खासदारकीच्या निवडणुकांत रोहित यांनी चांगली मदत केली.  सध्या कोणतेही राजकीय पद घेतले नसले, तरी आता शिक्षण पूर्ण झाल्याने राजकारणात येण्याचा त्यांचा मनोदय आहे. सध्या रियल इस्टेट , कन्सल्टींग व कन्सट्रक्शन या व्यवसायामध्ये करिअर सुरू आहे.

वधू पुजा यांनी औषधनिर्माणशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. रोहित यांचे सासरे श्रीमंत गणपती शिराळे हे चांदी व्यावसायिक असून कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी (ता. हातकणंगले) येथील रहिवासी  आहेत.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com