एसटी कर्मचारी वर्गाचा बांध फुटला परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि राज्यशासनाचा केला निषेध

कल्याण एसटी डेपो मधील कर्मचारी वर्गाचा आज अखेर बांध फुटला . सलग तिसऱ्या दिवशी संप सुरू राहिल्याने कर्मचारी वर्गाने आज काळी दिवाळी साजरी केली. यावेळी शोक सभा ते खासगी बसला विरोध आणि भीक मांगो आंदोलन, मुंडन करून आपला राग व्यक्त केला. यामुळे काही काळ एसटी डेपोमध्ये तणावाचे वातावरण होते.
एसटी कर्मचारी वर्गाचा बांध फुटला परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि राज्यशासनाचा केला निषेध

कल्याण : कल्याण एसटी डेपो मधील कर्मचारी वर्गाचा आज अखेर बांध फुटला . सलग तिसऱ्या दिवशी संप सुरू राहिल्याने कर्मचारी वर्गाने आज काळी दिवाळी साजरी केली. यावेळी शोक सभा ते खासगी बसला विरोध आणि भीक मांगो आंदोलन, मुंडन करून आपला राग व्यक्त केला. यामुळे काही काळ एसटी डेपोमध्ये तणावाचे वातावरण होते.

सोमवारी मध्यरात्री पासून सुरू असलेल्या एसटी कर्मचारी वर्गाच्या मागणी कडे परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि राज्य शासन लक्ष देत नसल्याने आज गुरुवार ता 19 ऑक्टोबर रोजी सकाळी कल्याण एसटी डेपो मध्ये कर्मचाऱ्यानी काळी दिवाळी साजरी करत निषेध व्यक्त केला. या संपकाळात हृदयविकाराच्या झटक्याने एसटी कर्मचारी एकनाथ वाघचौरे यांचे निधन झाले यामुळे एसटी कर्मचारी वर्गात संतापाचे वातवरण आहे.

कल्याण एसटी डेपो मध्ये आज गुरुवार ता 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 12 च्या सुमारास संपकरी एसटी कर्मचारी वर्गाने एकत्र येऊन शोकसभा घेत वाघचौरे यांना श्रद्धांजली अर्पण केली. संप संपल्यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या नावाने शिमगा
सलग तिसऱ्या दिवशी संप सुरू असून मागण्या मान्य करण्याऐवजी संप मोडीत काढण्यासाठी प्रशासन आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते हे करत असल्याचा आरोप करत आज कल्याण एसटी डेपो मध्ये उग्र आंदोलन करण्यात आले. काही कर्मचाऱ्यांनी मुंडन करत 'भीक मांगो' आंदोलन केले.

अंगणवाडीच्या आंदोलन कर्त्या महिलांना भेटण्यास शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना वेळ आहे. मात्र, आमची विचारपूस केली नसल्याची खंत एसटी कर्मचारी व्यक्त करत होते. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा निषेध करत जणू काही मयताला आलो असे दाखवीत काही कर्मचाऱ्यांनी  रडत आपला निषेध व्यक्त केला.

खासगी बसला विरोध
सलग तिसऱ्या दिवशी संप सुरू असताना मागण्या मान्य करण्याऐवजी स्थानिक प्रशासन ने आरटीओ आणि पोलीस बंदोबस्तात कल्याण एसटी डेपो मधून बसेस सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र संपकरी एसटी कर्मचारी वर्गाने त्याला विरोध केला.  'आमचा अंत पाहू नका, डेपो बाहेरून खुशाल बसेस सोडा, तुमच्या मंत्र्यांना खासगीकरण करायचे आहे ना? एकदा घोषित करा, आम्ही निघून जातो, तशी ही आमची येथेच दिवाळी गेली, अनेक जण घरी ही गेलेलो नाही, आम्ही जेल मध्ये जाऊ, येथेच मरू मात्र संप मागे घेणार नाही अशा भावना कर्मचारी पोलीस आणि आरटीओ अधिकारी समोर मांडल्या.' अखेर खासगी बसेस एसटी डेपो च्या बाहेर काढत तेथून सोडण्यात आल्या.

सलग तिसऱ्या दिवशी संपकरी आक्रमक झाल्याने कल्याण एसटी डेपो मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविला होता तर मुंबई मधून काय निरोप येतो याकडे सर्व कर्मचारी वाट पाहत होते. मात्र दुपार पर्यंत हाती निराशाच वाट्याला आल्याने ते संताप व्यक्त करत होते .

सलग तिसऱ्या दिवशी संपकरी आक्रमक झाल्याने कल्याण एसटी डेपो मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविला होता तर मुंबई मधून काय निरोप येतो याकडे सर्व कर्मचारी वाट पाहत होते. मात्र दुपार पर्यंत हाती निराशाच वाट्याला आल्याने ते संताप व्यक्त करत होते .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com