शिवसेनेकडून कोकणवासीयांची दिशाभूल : नारायण राणे

रत्नागिरी येथील राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरीबाबत तेथील स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे याच मुद्यावर आता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांनीसुद्धा विरोध दर्शविला आहे.
शिवसेनेकडून कोकणवासीयांची दिशाभूल : नारायण राणे

मुंबई : रत्नागिरी येथील राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरीबाबत तेथील स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे याच मुद्यावर आता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांनीसुद्धा विरोध दर्शविला आहे. 

रिफायनरी प्रकल्प होऊ नये यासाठी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. परंतु ही भेट म्हणजे शिवसेना नौटंकी करून कोकणवासीयांची दिशाभूल करत आहे, अशी टीका नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. 

रिफायनरी प्रकल्पाला माझा विरोध असून या प्रकल्पाची एक वीट सुद्धा कोकणात रचू देणार नाही. याबाबत मी काही दिवसांपूर्वीच नाणार येथे जाहीर सभा घेतली होती व तेथील ग्रामस्थांना मी ठासून सांगितले की हा प्रकल्प मी होऊ देणार नाही. माझ्या सभेला ग्रामस्थांची इतकी गर्दी पाहून कोकणातून शिवसेना हद्दपार होईल या भीतीपोटी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले, असा टोलाही राणेंनी लगावला. 

सुभाष देसाई उद्योगमंत्री असून त्यांना खरोखरच हा प्रकल्प नको असेल तर त्यांना त्याची परवानगी रद्द करण्याचा अधिकार आहे. रामदास कदम हे कोकणातले असून पर्यावरण मंत्री आहेत. या रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातल्या अकरा लाख आंब्याच्या तर दोन लाख काजूच्या झाडांचं नुकसान होणार आहे. असं असताना आतापर्यंत शिवसेनेचे मंत्री कदम याविरोधात कधीच काही बोलताना दिसले नाहीत. जनता या प्रकल्पाविरोधात जात आहे म्हणूनच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे नाटक करत आहेत, असेही राणे म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com