वाळूच्या गाड्या सोडण्यासाठी पन्नास हजाराची लाच...चाकणमध्ये पोलिसाला अटक

वाळूच्या गाड्या सोडण्यासाठी पन्नास हजाराची लाच...चाकणमध्ये पोलिसाला अटक

चाकण  येथील पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक शरद कृष्णा लोखंडे याला पन्नास हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास रंगेहाथ पकडले.

वाळूच्या गाड्या सोडण्यासाठी लोखंडे याने एक लाख रूपयाची लाच मागितली होती. त्यापैकी पन्नास हजार रूपये लाच घेताना त्याला चाकण पोलिस ठाण्यात सापळा रचून पकडले.

लोकसेवक म्हणून काम करत असताना लाच स्वीकारली याप्रकरणी आरोपी शरद लोखंडे (वय-36) ,तसेच लोखंडे ला मदत करणारा खासगी व्यक्ती आनंदा नामदेव शिवळे (वय-42, रा. महाळुंगे ,ता.खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती पोलिस निरीक्षक चंद्रकांत चौधरी यांनी दिली.

पोलिस नाईक लोखंडे याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आली होती. लोखंडे याने तक्रारदार यांच्या वाळूच्या गाड्या पोलिस ठाण्यातून सोडण्यासाठी तक्रारदाराचे वाहन ब्रिझा कार ठेऊन घेतली व स्टॅम्प पेपरवर आरोपी शिवळे याच्यासोबत पैसे देण्या-घेण्याचा व्यवहार दाखविला. कार पोलिस ठाण्यातून सोडविण्यासाठी व स्टॅम्प पेपर फाडून टाकण्यासाठी लोकसेवक लोखंडे याने एक लाख रूपये लाचेची मागणी केली.

त्यातील पन्नास हजार रूपये स्वीकारताना लोखंडे याला पोलिस ठाण्यात पकडले. यावेळी सापळा रचलेल्या पथकात पोलिस निरीक्षक चौधरी, पोलिस निरीक्षक क्षीरसागर, पोलिस हवालदार शेळके, सहाय्यक फौजदार उदय ढवणे, पोलिस किरण चिमटे, माळी आदी होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com