पाकवर हल्ला करा : खासदार आढळराव

पाकवर प्रतिहल्ला करून पुलवामा हल्याचा बदला घ्या आणि देशाच्या शत्रूला कायमचा धडा शिकवा,अशी मागणी शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.
पाकवर हल्ला करा : खासदार आढळराव

पिंपरी: पाकवर प्रतिहल्ला करून पुलवामा हल्याचा बदला घ्या आणि देशाच्या शत्रूला कायमचा धडा शिकवा,अशी मागणी शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. 

दरम्यान, या अतिरेकी हल्यानंतर त्यांनी आज दिवसभराचे आपले कार्यक्रम रद्द केले.

जम्मू काश्मीरमधील सर्वात मोठ्या अशा कालच्या आत्मघाती अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४२ जवान हुतात्मा झाले. त्यानंतर देशभर संतापाची लाट पसरली आहे. हाच जनक्षोभ केंद्रापर्यंत पोचविल्याचे आढळराव यांनी सांगितले. या हल्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे, असे ते म्हणाले. या घटनेनंतर त्यांनी लगेचच पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांना पत्र लिहून पाक या शत्रूला कायमचा धडा शिकवण्याची भाषा केली.  

दरम्यान, या हल्ल्यानंतर शिवसेनेने आज राज्यभर तीव्र निषेध आंदोलन छेडले. त्याअंतर्गत ते पिंपरी चिंचवड आणि शिरूर मतदारसंघात झाले. राज्य शिव व्यापारी संघाचे अध्यक्ष व शिवसेनेचे संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी,तर  आत्मघाती बॉम्ब बनून या हल्याचा बदला घेण्यास तयार असल्याचे सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com