पार्थ यांच्या पिछाडिने अजित पवार यांनाच दे धक्का!

पार्थ यांच्या पिछाडिने अजित पवार यांनाच दे धक्का!

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार पाचव्या फेरीअखेर 90 हजार मतांनी पिछाडीवर गेल्याने ते पराभवाच्या छायेत आहेत. निकालाअंती पार्थ पवार यांना पराभव स्वीकारावा लागला तर अजित पवार यांच्यासाठीच हा धक्का आहे.

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अजित पवार यांच्यासाठी सर्वात प्रतिष्ठेची ठरलेली जागा ही मावळची होती. मावळमध्ये काय होणार याचीच चर्चा राज्यभर होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरवातीला पार्थ यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. मात्र, बऱ्याच घडामोडीनंतर पार्थ यांची उमेदवारी निश्‍चित झाली. प्रचारासाठी राष्ट्रवादीची राज्यातील मोठी फौज मावळमध्ये तळ ठोकून होती. जिल्ह्या-जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे बडे नेते महिनाभर मावळमध्ये तळ ठेकून होते. मात्र, याचा कोणताही परिणाम पार्थ यांना विजय मिळविण्यात होताना दिसत नाहीतय

प्रचार आणि मतदानानंतर कोणत्याही परिस्थितीत पवार कुटुंब पार्थला अपयश येऊ देणार नाहीत, अशी चर्चा होती. मात्र, मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून पार्थ यांना आघाडी घेता आली नाही. पार्थ यांच्या पराभवाने अजित पवार यांची अडचण होणार आहे. शरद पवार यांचा विरोध असताना अजित पवार आणि कुटुंबियांच्या आग्रहामुळे पार्थ यांना उमेदवारी देण्यात आली.

गेल्या वीस वर्षात अजित पवार यांनी पिंपरी आणि परिसरात केलेले काम आणि जनसंपर्काच्या जोरावर आपल्या मुलाच्या विजयसाठी काहीही करतील, असे सांगितले जात होते. मात्र. प्रत्यक्षात सुरू असलेल्या मतमोजणीनुसार आपल्या मुलासाठी विजयाची मोट बांधण्यात अजित पवार यांना यश येताना दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com