महेश लांडगेंसाठी रोड शो; तर लक्ष्मण जगतापांसाठी मुख्यमंत्र्यांची उद्या सभा

महेश लांडगेंसाठी रोड शो; तर लक्ष्मण जगतापांसाठी मुख्यमंत्र्यांची उद्या सभा

पिंपरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा प्रचाराच्या पहिल्या टप्यातच पिंपरी चिंचवडमध्ये एक दिवसाच्या अंतराने येत आहेत. मुख्यमंत्री हे ठाकरेंच्या एक दिवस अगोदर येत आहेत.

ठाकरेंचा दौरा काल जाहीर झाल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांचा झाला. ठाकरे यांची फक्त सभा त्यांच्या उमेदवाराच्या मतदारसंघात (पिंपरी) होत आहे. तर,मुख्यमंत्री हे आपल्या एका उमेदवारासाठी भोसरीत रोड शो करून दुसऱ्याकरिता चिंचवडला सभा घेणार आहेत.

महायुतीच्या शहरातील प्रचाराचा नारळ ठाकरे हे शुक्रवारी (ता.११) शिवसेनेचे उमेदवार अॅड गौतम चाबूकस्वार यांच्यासाठी सभा घेऊन फोडणार आहेत.तर, मुख्यमंत्री हे गुरुवारी (ता.१०) भाजपचे भोसरीतील उमेदवार महेश लांडगे (भोसरी) यांच्यासाठी ते मतदारसंघात सायंकाळी पाच वाजता रोड शो करणार आहेत.

नंतर ते लक्ष्मण जगताप (चिंचवड) यांच्याकरिता त्यांच्या मतदारसंघात सहा  वाजता सभा घेणार आहेत. दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या टप्यातही मुख्यमंत्री शहरात येणार आहेत. त्यावेळी ते चिंचवडला रोड शो करून भोसरीत सभा घेणार आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com