पिंपरीच्या जागेसाठी शिवसेनेत स्पर्धा वाढली; नगरसेवकाने विधानसभेसाठीची तुतारी फुंकली

पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेत चुरस वाढली आहे.विद्ममान आमदार अॅड.गौतम चाबूकस्वार पु्न्हा तयारीत असताना पक्षाचे नगरसेवक अॅड सचिन भोसले यांनीही पिंपरीतून शुक्रवारी दावेदारी जाहीर केली.नमूद करण्याजोगी बाब म्हणजे चिंचवड मतदारसंघातून नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत.
पिंपरीच्या जागेसाठी शिवसेनेत स्पर्धा वाढली; नगरसेवकाने विधानसभेसाठीची तुतारी फुंकली

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेत चुरस वाढली आहे.विद्ममान आमदार अॅड.गौतम चाबूकस्वार पु्न्हा तयारीत असताना पक्षाचे नगरसेवक अॅड सचिन भोसले यांनीही पिंपरीतून शुक्रवारी दावेदारी जाहीर केली.नमूद करण्याजोगी बाब म्हणजे चिंचवड मतदारसंघातून नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत.

शहरातील तीनपैकी चिंचवड आणि भोसरी हे मतदारसंघ भाजपकडे आहेत. तर, पिंपरी हा शिवसेनेकडे आहे. तेथे लोकसभेला मावळमधील पक्षाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना लीड मिळाल्याने चाबूकस्वार यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. असे असताना आज भोसले यांनीही तेथून इच्छुक असल्याचे जाहीर केल्याने तो चर्चेचा विषय झाला. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा (ता.27) त्यासाठी मुहूर्त शोधला आहे. हा वाढदिवस आणि पक्षाच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त पर्यावरण रक्षणाचा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे.त्याअंतर्गत ‘वृक्षवेलींच्या स्वरूपात शिवसेना आपल्या घरात’या उपक्रमाव्दारे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना भोसले हे 54 हजार रोपांचे वाटप करणार आहेत. 

त्याची सुरवात शनिवारी (ता.27)पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मुंबईत मातोश्रीवर जाऊन रोप देऊन भोसले करणार आहेत. त्यानंतर पिंपरीत घरोघरी रोपवाटप केले जाणार आहे. पर्यावरण संतुलन आणि संवर्धन ही काळाची गरज असून, त्यासाठी पुढाकार घेऊन काम करणे गरजेचे आहे.प्रत्येक नागरिकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक झाडं लावणे गरजेचे असून त्यासाठी अशा योजना राबविणे आवश्यक आहे. म्हणून वृक्षांचे वाटपच नाही,तर त्याचे महत्त्वही पटवुन दिले जाणार आहे, असे भोसले यांनी सांगितले. पक्षाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संतुलन आणि संवर्धनासाठी जनजागृती करीत हा उपक्रम राबविला जाणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com