तुकाराम पगडी घालून कन्नड आमदार म्हटले `जय महाराष्ट्र' 

नुकतेच पुण्यासह राज्यात पगडीचे मोठे राजकारण झाले. या राजकीय वादाच्या पार्श्‍वभूमीवर पार्श्वभूमीवर चक्क एका कन्नड आमदारांनी चक्क संत तुकाराम महाराजांची पगडी घालून "जय महाराष्ट्र' म्हटले. मराठी, कानडी व त्यातही सीमावादावर ही आगळी घटना तळेगाव दाभाडे येथे घडली. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक संबंधावर त्यांनी सामंजस्यपूर्ण भाष्य केले.
तुकाराम पगडी घालून कन्नड आमदार म्हटले `जय महाराष्ट्र' 

मावळ : नुकतेच पुण्यासह राज्यात पगडीचे मोठे राजकारण झाले. या राजकीय वादाच्या पार्श्‍वभूमीवर पार्श्वभूमीवर चक्क एका कन्नड आमदारांनी चक्क संत तुकाराम महाराजांची पगडी घालून "जय महाराष्ट्र' म्हटले. मराठी, कानडी व त्यातही सीमावादावर ही आगळी घटना तळेगाव दाभाडे येथे घडली. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक संबंधावर त्यांनी सामंजस्यपूर्ण भाष्य केले. 

पुणेरी आणि फुले पगडीवरून वाद सुरू असताना तुकोबारायांची पगडी घालून रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले प्रमुख पाहुणे असलेल्या कानडी आमदारांना तुकोबारायांची पगडी घालून हा वाद वाढविला नाही. त्याउलट हुशारीने तो टाळला. त्यामुळे तळेगाव दाभाडे परिसरात तो चर्चेचा विषय झाला आहे. 

महांतेश गौडर असे या भाजप आमदारांचे नाव आहे. ते बेळगाव जिल्ह्यातील कित्तूरचे प्रतिनिधित्व करतात. एकात्मतेचा संदेश देताना त्यांनी आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांतून विठोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचे उदाहरण दिले. त्यातही पुणेरी, फुले आणि तत्सम विविध पगड्यांच्या वादावर त्यांनी तुकोबारायांची पगडी परिधान करून आगळ्या प्रकारे वेगळी किनार या वादाला दिली. 

प्रत्येक पगडी वैशिष्ट्य विचारसरणीचे प्रतिनिधित्व करते. याबरोबरच काही पगड्यांकडे सामाजिक परिवर्तनाचे आणि ऐक्‍याचे प्रतीक म्हणूनही पहिले जाते. त्यामुळे या प्रातिनिधिक पगड्यांवरुन गेल्या महिन्यापासून जातीचे आणि वर्गाचे राजकारण पुण्यात चांगलेच तापले होते. आमदार गौडर यांचे मावसभाऊ शंकर हादीमनी हे रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष झाले. त्यांच्या व त्यांच्या नव्या कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभासाठी गौडर खास कर्नाटकातून महाराष्ट्रात रविवारी (ता.15) आले होते. ते या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. 

पगडी वादाच्या तोंडावर क्‍लबचे संस्थापक संतोष खांडगे,अध्यक्ष शंकर हादीमनी,गणेश काकडे,रोटरीचे पुणे प्रांतपाल रवी धोत्रे,प्रशांत जगताप यांनी गौडर यांचा तुकाराम पगडी घालून तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांचे भक्ती-शक्ती शिल्प सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी गौडर यांना येत्या आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठलाच्या पूजेला येण्याचे आमंत्रण दिले. 

गौडर यांनी आपल्या भाषणात पंढरपूरला आषाढीनिमित्त जाणाऱ्या महाराष्ट्रर व कर्नाटकातील वारकरी संप्रदायाच्या एकात्मतेचा उल्लेख केला. वारकरी संप्रदाय हा थोर असून, मावळ ही भक्ती आणि शक्तीची भूमी आहे. संतांच्या पावनभूमीत अर्थात तळेगावात झालेला सहृदय सत्कार हा सर्वांचा आशीर्वाद आणि ईश्वरकृपा असल्याची कृतज्ञता गौडर यांनी यावेळी व्यक्त केली. मराठी येत नसल्याने गौडर यांनी कन्नड भाषेत केलेल्या भाषणाच्या शेवटी "जय हिंद, जय कर्नाटक' आणि शेवटी "जय महाराष्ट्र' देखील म्हटले. पगडी आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम पगडीत एका कानडी आमदाराचा जय महाराष्ट्र साहजिकच एकात्मतेचा संदेश देत उपस्थितांची मने जिंकून गेला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com