जगताप - लांडगे गटातील मतभेद कायम ;राहूल जाधव यांचा पदाचा राजीनामा

Jagtap-Landhe-PCMC
Jagtap-Landhe-PCMC

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी आपल्या समर्थकाची  टर्म असूनही ते पद न मिळाल्याने आमदार महेशदादा लांडगे गटाची नाराजी अद्याप कायम आहे.

शहराचे कारभारी आणि भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी ऐनवेळी पुन्हा आपल्याच समर्थकाकडे पालिकेच्या खजिन्याची चावी दिल्याने लांडगे गट अस्वस्थ आहे. त्यातूनच या पदाचे अयशस्वी ठरलेले त्यांचे प्रबळ दावेदार राहूल जाधव यांनी आपल्या स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा आता महापौरांकडेच दिला आहे.

स्थायी अध्यक्षपद हुकलेल्या जाधव यांचे लक्ष्य आता महापौरपदावर आहे.लांडगे गटाकडेच सध्या हे पद आहे. स्थायी अध्यक्षपद हातचे गेल्यानंतर आता महापौरपद टिकविण्यासाठी लांडगे गट कामाला लागला आहे.त्यातूनच जाधव यांचा राजीनामा आल्याची चर्चा ऐकिवात आहे.

पालिकेत सत्ता आणण्यात भाऊंबरोबर दादांचाही तेवढाच वाटा आहे.मात्र, पालिकेत या गटाला तुलनेने कमी व गौण पदे मिळाली आहेत.सध्या,त्यांच्याकडे महापौर हे शोभेचे व अकार्यकारी हेच ते काय मोठे असे एकमेव पद आहे.त्यामुळे ते स्थायी अध्यक्ष पदासारखे ऐनवेळी निसटू देण्याची त्यांची तयारी नाही.

ते टिकवून त्यापदी आपलाच दुसरा समर्थक बसविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.हे पद पहिले अडीच वर्षे ओबीसीसाठी आहे. त्यामुळे सव्वा वर्षानंतर ते बदलून तेथे दोघांना संधी देण्याचा पक्षाचा विचार आहे. परिणामी मे महिन्यात ते बदलले,तरी तेथे पुन्हा जाधव यांच्यारुपाने आपलाच समर्थक असावा म्हणून ही राजीनाम्याची चाल करण्यात आल्याची चर्चा आहे.

जाधव हे आपल्या राजीनाम्य़ावर ठाम आहेत.त्यामुळेच ते कालच्या स्थायीच्या (नवनिर्वाचित) पहिल्या बैठकीलाही उपस्थित राहिले नाहीत. तसेच राजीनामा त्यांनी यावेळी महापौरांकडे दिला आहे. तसेच दादांना सांगून तो दिला आहे.परिणामी तो मंजूर होण्याची दाट शक्यता आहे.

स्थायी अध्यक्ष म्हणून मी शर्यतीत होतो. ते पद मिळाले नाही. त्यामुळे सदस्य म्हणून समितीत राहणे योग्य वाटत नसल्याने सदस्यपदाचा राजीनामा दिल्याचे जाधव यांनी सांगितले.

त्यातून स्थायी अध्यक्षपद उमेदवारीतून दादा,भाऊ गटात वाढलेली तेढ अद्याप निमाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.स्थायी सदस्य,स्थायी अध्यक्ष यांच्याप्रमाणेच उपमहापौर आणि सभागृहनेतेही बदलण्याच्या ठरले,तर त्यापदी आपलाच पाठीराखा बसविण्यासाठी ही शर्यत आणखी वेगवान होईल, यात वाद नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com