मंत्रिपद मिळाले नाही, तर पिंपरीत राजकीय उलथापालथ 

मंत्रिपद मिळाले नाही, तर पिंपरीत राजकीय उलथापालथ 

पिंपरी : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला आता नवरात्रानंतरचा नवा मुहूर्त सांगण्यात आला आहे. त्यामुळे दसरा (शिवसेनेचा मेळावा) आणि मंत्रीमंडळ विस्तार याकडे पिंपरी-चिंचवडचे लक्ष लागले आहे. कारण दसरा मेळाव्यातील शिवसेनेची घोषणा व भूमिका आणि मंत्रिमंडळात शहराला स्थान मिळाले नाही, तर शहर भाजपमध्येच नव्हे, तर शिवसेनेतही मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे. 

पिपरी-चिंचवड पालिकेत भाजपची सत्ता आणूनही पिंपरीला मंत्रिमंडळात स्थान देण्याची रास्त मागणी गेल्या चार वर्षात मान्य झालेली नाही.त्यामुळे त्यासाठी इच्छुक असलेल्या शहरातील भाजपच्या दोन्ही आमदारांनी संयम ठेवला असली,तरी त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आता तो सुटत चालला आहे. वेगळी भाषा ते बोलू लागले आहेत.

मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार असलेले भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी त्यात मावळमधून खासदारकी लढणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केल्याने पेच बिकट झाला आहे. लोकसभेला युती होण्याची शक्‍यता आहे. ती झाली, तर, भाऊंचा निर्धार कायम राहतो का?आणि ते तो कसा अमलात आणतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. गेली 14 वर्षे आमदार असलेले भाऊ मंत्रिपदाचे प्रबळ हक्कदार आहेत. त्यामुळे त्यांनाच काही महिने तरी मंत्रिपद मिळेल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना अजून वाटते आहे. ते मिळाले,तर सर्वच प्रश्‍न मिटणार आहेत. मात्र, त्याने हुलकावणी दिली,तर लोकसभेला उलथापालथ होऊ शकते.

सध्या शिवसेनेकडे असलेल्या मावळवर भाजप दावा सांगेल,असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. गेल्या लोकसभेनंतर मावळमध्ये राजकीय उलथापालथ झाली असून वातावरण पक्षाला शिवसेनेपेक्षा अधिक पोषक झाल्याचा आधार त्यासाठी घेतला जाऊ शकतो. आमदारांचे संख्याबळही भाजपचे मित्रपक्षापेक्षा मावळमध्ये अधिक आहे. पिंपरी-चिंचवडसह पनवेल या मतदारसंघातील महापालिका व वडगाव मावळ आणि लोणावळा नगरपरिषद पक्षाच्या ताब्यात आहे. दुसरीकडे सध्या मावळमध्ये शिवसेनेचा खासदार आहे. त्यामुळे ते तो सोडण्याची सुतराम शक्‍यता नाही. यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हे युतीत दुहीचे बीज पुन्हा पेरण्याचे निमित्तही ठरेल, असा तर्क आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com