तळेगाव स्टेशन : राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण यांचे पती हेमंत चव्हाण यांच्या मालकीच्या सुदवडी येथील फार्म हाऊसच्या सभोवताली असलेल्या उसाच्या फडाला शनिवारी (ता.२९) सायंकाळी पावने सहाच्या सुमारास आग लागली.
दिल्ली दंगल : कागदी घोड्यांमुळे मृतदेह मिळण्यास होतोय विलंब https://t.co/k5wKZy8AHv
— MySarkarnama (@MySarkarnama) February 29, 2020
जवळपास काम करत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून आगीची माहिती मिळताच तळेगाव नगरपरिषद, चाकण एमआयडीसी, पीएमआरडीए आणि तळेगाव एमआयडीसीचे अग्नीशमन बंब रवाना झाले. तासाभरानंतर आग आटोक्यात आली.
मावळ तालुक्यातील तळेगाव-चाकण महामार्गावरील श्री क्षेत्र भंडारा डोंगर पायथ्यालगत असलेल्या रेनबो फार्मच्या परिसरातील अंदाजे अडीच एकर ऊस जळून खाक झाला.
याबाबत खासदार चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सहा एकर ऊस होता. महावितरण कंपनीच्या तारा ट्रीप झाल्यामुळे ही आग लागली. खरे तर आम्ही याबाबत वारंवार महावितरणला पत्र लिहून कळवले होते. मात्र पुढे त्यात काही झाले नाही. संपूर्ण ऊस हा ठिंबक सिंचनवर आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.